बातम्या

वर्षावास निमित्त GBC इंडियाच्या वतीने थायलंडचे प्रसिद्ध भन्ते डॉ सिरिमंगलो यांचे धम्म प्रवचन

ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्ग्रिग्रेशन इंडियाच्या वतीने वर्षावास निमित्त जगभरातील प्रसिद्ध पुज्यनीय भन्तेजींकडून ऑनलाईन धम्मदेसना (धम्म प्रवचन) देण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. मागील तीन महिन्यापासून ऑनलाईन धम्म धम्मदेसनेचा भारतीय बौद्ध उपासकांना लाभ मिळत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वर्षावास निमित धम्म GBC इंडिया आयोजित ऑनलाईन धम्मदेसना उपक्रमात थायलंड येथील प्रसिद्ध भन्ते डॉ फ्रामह सोमपोंग सिरिमंगलो (सहाय्यक अब्बोट, वाट फ्रा काईव, चिआंग राई शहर) यांचे सहा (०६) सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता ”धम्म आचरणाचा पाया” या विषयावर धम्म प्रवचन आयोजित केले आहे. www.gbcindia2020.in या वेबसाईटवर आपल्यालाही सहभागी होता येणार आहे.

थायलंड येथील चिआंग राई शहरातील वाट फ्रा कैव बुद्ध विहार

थायलंड मधील राजेशाही बौद्ध विहार

चिआंग राई शहरातील वाट फ्रा कैव हे एक राजेशाही बौद्ध विहार आहे. या शहरातील सर्वात प्रसिद्ध विहार मानले जाते. जवळपास १४ व्य शतकात विहार उभारण्यात आले असे मानले जाते. तसेच थाई संस्कृतीतील सर्वात महत्वाचे विहार आहे. ज्यामध्ये हिरव्या रंगाच्या (बेरिल) पाचूपासून बनवलेली मूर्ती असून १४३४ मध्ये सापडली होती. हे विहार १० हजार ६४० मीटर परिसरात पसरलेले आहे. १९७८ मध्ये थाई राज घराण्यातील राजाने या विहाराचे पुनर्निर्माण केले होते. उत्तर थायलंड मध्ये बौद्ध शिक्षण आणि संघ प्रशासनाचे मुख्य केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे. तसेच सध्या हिरव्या रंगाच्या पाचू (बेरिल) पासून बनवलेली बुद्धमूर्ती थायलंड येथील बँकॉकच्या ग्रॅन्ड रॉयल पॅलेस मध्ये आहे.

येथे पाहा
वेळ : सहा (०६) सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता फक्त www.gbcindia2020.in या वेबसाईटवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *