बातम्या

ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद; बुद्धिस्ट देशांकडून कौतुक

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी बुद्ध पौर्णिमा घरातून केली जावी तसेच ह्या काळात तथागतांचे विचार घराघरात पोहचावे म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांनी ५,६,आणि ७ मे रोजी तीन दिवशीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. काल ५ मे रोजी दिवसभर विविध ऑनलाईन कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी वेबिनारवर जगभरातून एकाचवेळी १६ हजार तर आवाज इंडिया चॅनेलवर ४० हजार लोकांनी लाईव्ह कार्यक्रम पाहिला आहे. ह्या धम्म परिषदेचे फेसबुक, यु ट्युब, आवाज इंडिया आणि GBC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रेक्षपण होत आहे.

ऑनलाईन जागतिक धम्मपरिषदेत आठ देशातील वरिष्ठ बौद्ध भिक्खू धम्मदेसना देत आहेत. तसेच मंगळवारी (ता.पाच) भारतासह जगभरातील लाखो लोकांनी घरी बसून ऑनलाईन धम्मपरिषेदत सहभाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात घरीच बसून बुद्ध पौर्णिमा ऑनलाईन साजरी करणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तथागतांचे अमूल्य विचार जगभरात पोहचवण्याच्या जागतिक धम्म परिषदेच्या ह्या उपक्रमाचे आणि डॉ. हर्षदीप कांबळे सर यांचे जगभरातील बुद्धिस्ट देशांकडून कौतुक होत आहे.

आज सकाळी मलेशियाचे महिंदा भिक्खु ऑस्ट्रेलियावरून लाईव्ह विपश्यना कशी करावी याबद्दल सांगितले. दुपारी २:३० वाजता महिंदा भिक्खु धम्मदेसना देणार आहेत तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा. त्यानंतर श्रीलंकेचे भन्ते डॉ पीयरताना ह्यांची धम्मदेसना ४ वाजता होणार आहे. जागतिक धम्म परिषदेचे सर्व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी www.gbcindia2020.in या संकेस्थळाला भेट द्यावी. तसेच बुद्ध पौर्णिमेचा निमित्ताने लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरजू लोकांना अन्नदान करावे व कुशल कम्मात सहभागी व्हावे अशी विंनंती डॉ.हर्षदीप कांबळे यांनी केली आहे.