जगभरातील बुद्ध धम्म

कॅनडातील ५० फूट उंचीची व २५ टन वजनाची सोनेरी बुद्धमूर्ती

कॅनडामध्ये अल्बर्टा या उपनगरात वेस्टलॉक येथील ध्यान केंद्राच्या प्रांगणात मागील आठवड्यात ५० फूट उंचीची व २५ टन वजनाची धातूची बुद्धमूर्ती नुकतीच उभारण्यात आली. या ध्यान केंद्राच्या आवारातील कमळावरील स्थापित बुद्धमूर्ती मानवी जीवनातील शांततेचे महत्व अधोरेखित करेल असे ध्यान केंद्राच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे.

बुद्धशिल्पाच्या सभोवतालचे उंचावरून घेतलेले विहंगम दृश्य

वेस्टलॉक ध्यान केंद्रात नियमितपणे ध्यान साधनेचे वर्ग चालतात. या बुद्धमूर्तीचा पुतळा चीन वरून आणण्यात आला असून कॅनेडियन सरकारच्या स्टॅंडर्ड प्रमाणे ज्यादा स्टीलचा वापर करून त्यास मजबूत करण्यात आले व २१ मार्च २०१९ रोजी दोन क्रेनच्या सहाय्याने उपस्थित समुदायासमोर विधिपूर्वक बुद्धशिल्प उभारण्यात आले.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

सोनेरी बुद्धमूर्ती

One Reply to “कॅनडातील ५० फूट उंचीची व २५ टन वजनाची सोनेरी बुद्धमूर्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *