बातम्या

स्पेनमध्ये उभारणार ४० मीटर उंचीची बुद्धमूर्ती; महाराष्ट्रापेक्षा छोटा देश करतोय सहकार्य

स्पॅनिश शहर कॅसेरस आणि लुंबिनी, नेपाळ यांच्या सहकार्याने मोठी ध्यानस्थ बुद्ध मूर्ती आणि विहार स्पेनमध्ये उभे राहत आहे. या बाबत नुकत्याच सामंजस्य करारावर सह्या झाल्या. तसेच माद्रिद फिटूर पर्यटन महोत्सवात २२ जानेवारी रोजी याबाबत प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. लुम्बिनी गार्डन फाउंडेशन यांच्यातर्फे निधी उभारण्यात येणार असून ध्यानस्थ बुद्ध मूर्तीची उंची जवळजवळ ४० मीटर उंच असणार आहे. यासाठी अंदाजित खर्च २५ मिलियन युरो येणार असून अन्य देश तसेच खाजगी देणगीदार कडून देणगी गोळा करण्यात येणार आहे.

लुंबिनी संस्कृतिक महानगरपालिकेचे महापौर चौधरी म्हणाले की याचा मुख्य हेतू बुद्धांचे शांतीचे तत्त्वज्ञान जगभर प्रसार करणे हा आहे. स्पॅनिशची राजधानी माद्रिद येथील महापौर सलाया यांनी सांगितले की यामुळे अशियातील अनेकजण येथे येतील. तसेच त्यांच्या व्यापारासाठी मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध होईल. या बुद्ध संकुलात उद्यान, विहार, स्तुप, वाचनालय असणार आहे. तसेच बुद्ध धातू तेथे ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रापेक्षा छोटे असलेले भारता शेजारील नेपाळ राष्ट्र असा विश्वमय विचार करते तर भारतातील राजकीय नेते काय करत आहेत ? बुद्ध तत्वज्ञान अखिल मानावजातीस कल्याणकारी आहे. धर्म-पंथ न मानता त्यांच्या तत्वज्ञानाचा मनापासून स्वीकार केला तरच खरी प्रगती होणार आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालाल तरच इतर बौद्ध राष्ट्रे वडीलबंधु म्हणून मान देतील. याचे आकलन लवकरात लवकर सर्वांना होवो अशी आशा धरूया.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)