बातम्या

औरंगाबादकर करतायेत धम्म परिषदेची जय्यत तयारी; शनिवारी समता दुचाकी फेरी

औरंगाबाद: शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत तसेच आयएएस अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे व उपासिका रोजना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे औरंगाबादकर मोठ्या उत्साहाने जागतिक बौध्द धम्म परिषदेची जय्यत तयारी करत आहेत.

जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या ५०० स्वयंसेवकांना आपल्या निवासस्थानी ठेऊन घेण्यासाठी शहरातील महिला उपासिकामध्ये स्पर्धाच लागली. जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या पूर्वतयारी निमित्त शुक्रवारी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेण्यात आली. बाहेर गावाहून येणाऱ्या स्वयंसेवकांना आपल्या निवासस्थानी सुविधा पुरविण्याचे आवाहन संयोजकांनी केले होते. याबैठकीत डॉ. अरविंद गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

या परिषदेत उपासिकांना विविध जबाबदाऱ्या वितरित करताना डाॅ.गायकवाड यांनी बाहेर गावाहून येणाऱ्या स्वयंसेवकांना येथील उपासकांच्या निवासस्थानीच का ठेवावे या मागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर प्रत्येक उपासिकेने स्वयंसेवकांसाठी मागणी नोंदवली. त्याशिवाय भंतेजीच्या विहारातून राहणे व भोजणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलली.

बैठकीला कमल मनोरे, दैवशीला गवांदे, शोभा काळे, उर्मिला ओहळकर, संगीता अभ्यंकर, करूणा खरात, मंगल बनकर, कमल सावंत, मीना वानखेडे, प्रा. झीने, मैना बोदडे, संघमित्रा बनसोड, अनिता हिवाळे, सगल गायकवाड, भारती गायकवाड, शालू दाभाडे, भालनबाई बनकर, समिंर्र्दाबाई गवंदे आदी ची उपस्थिती होती.

पांढरे वस्त्र व हेल्मेट परिधान करून फेरीत या…
धम्म परिषदेनिमित्त शनिवारी सकाळी ८.३० वाजता भडकलगेट येथून शहरातून समता दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत सहभागी होतांना दुचाकी स्वारांनी पांढरे वस्त्र व हेल्मेट परिधान करून सहभागी व्हावे. दुचाकीला बांधण्यासाठी पंचशील ध्वज भडकलगेट येथे उपलब्ध करून दिले जातील.फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जागतिक बौध्द धम्म परिषदेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी http://gbcindia2019.in/ या साईटला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *