बातम्या

जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा वेरूळ लेण्यांच्या सावलीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांतिभूमी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक धम्म परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी http://gbcindia2019.in/ या वेबसाईटला भेट द्या!

लंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर यांच्यासह आयुष्यमती रोजाना व्हॅनिच कांबळे आणि आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या भेटीचे छायाचित्र.

या जागतिक धम्म परिषदेला जगभरातील श्रीलंका, नेपाळ,कंबोडिया, जपान, व्हीयतनाम, बर्मा,थायलंड या सह इतर देशातून अनेक मान्यवर बौद्ध भिख्खू उपस्थित राहणार आहेत. ही परिषद 22 ते 24 नोव्हेंबर पर्यंत आयोजित केली जाणार आहे.भारतात पहिल्यांदाच विविध देशातील गणमान्य बौद्ध भिख्खू संघ या परिषदेत सहभागी होणार आहेत.या परिषदेत तथागत बुद्धांनी दिलेल्या मानवतावादी शिकवणीचा प्रचार प्रसारा संबंधी विचार मांडले जाणार आहेत.

भगवान बुद्ध यांनी समाजाला काय शिकवण दिली या विषयी अधिकार वाणीने जगभरातील जेष्ठ बौद्ध भिख्खू गण मार्गदर्शन करणार असल्याचे ऑल इंडिया भिख्खू संघाचे अध्यक्ष भदंत Sadanand Mahasthavir यांनी कळविले आहे.भारत ही बुद्धभूमी असून जगाला प्रेमभाव देणारा व शांतीचा संदेश देऊन दुःखमुक्ती कडे घेऊन जाणार महामानव भारत भूमीतील आहे.

आदरणीय गुरुवर्य दलाई लामा यांच्यासह आयुष्यमती रोजाना व्हॅनिच कांबळे आणि आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या भेटीचे छायाचित्र.

सम्राट अशोकाच्या नंतर ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतिमान केले त्यांच्या शैक्षणिक क्रांतिभूमीला वंदन करण्यासाठी, तिच्याविषयी आदर भाव व्यक्त करता यावा व आपल्या हातून काही धम्म कार्य व्हावे या महान हेतूने जगभरातील बौद्ध भिख्खू औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एका धम्मपीठावर , उपासिका रोजना व्हॅनीच कांबळे व डॉ हर्षदीप कांबळे यांच्या पुढाकाराने येत आहेत.

22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरातील क्रीडांगनावावर पहिल्यांदाच होत असलेल्या या जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक धम्म परिषदेचे उद्घघाटन श्रीलंका येथील सर्वोच्च महाथेरो महानायका डॉ ओरकागोडा धम्मसिद्धी गुणरत्न यांच्या हस्ते होणार आहे.

23नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता आतंरराष्ट्रीय बौद्ध धम्म गुरू दलाई लामा व जगभरातून आलेले मान्यवर भिख्खू गण जगप्रसिध्द अजिंठा महामार्गावर थायलंड येथील धम्मउपासिका रोजना व्हॅनीच कांबळे व जेष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांच्या दानातून निर्माण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या लोकुत्तरा भिख्खू ट्रेनिंग सेंटर चौका येथे भेट देणार असून बौद्ध परंपरेनुसार विश्वाच्या कल्याणासाठी पूजापाठ करणार आहेत.सायंकाळी 5.30 वाजता पीईएस मिलिंद महाविद्यालया नागसेनवन क्रीडांगण येथे भव्य धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत सर्व जनतेसाठी विपश्यना सत्र आयोजित केले आहे.सकाळी 10 ते 11.30 या वेळेत जगप्रसिध्द पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांचे औरंगाबाद येथील ऐतिहासिक नागसेनवन भूमीवरून जगाला बुद्धांनी दिलेल्या प्रेम,शांती, प्रज्ञा,शील,करुणा,अहिंसा,सामाजिक बंधुभाव या सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित प्रवचन होणार आहे.

याच ठिकाणी १ ते 5 या वेळात भारतीय बौद्ध भिख्खू यांच्यासाठी मार्गदर्शन पर दोन परिसंवाद आयोजित केले आहेत. सायंकाळी साडेपाच ते आठ पर्यंत जगभरातील मान्यवर धम्मगुरु धम्मदेशना देणार आहेत.सायंकाळी8 ते 10 या वेळात सांस्कृतिक कार्यक्रमाने परिषदेचा समारोप होणार आहे.या ऐतिहासिक धम्म परिषदेला औरंगाबाद सह महाराष्ट्रातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

One Reply to “जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

  1. नक्कीच येणार या धम्म परिषद ला धम्म अजून जाणून घ्यायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *