ब्लॉग

अभूतपूर्व जागतिक धम्मसोहळा आणि डॉ.हर्षदीप कांबळे

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समिती तर्फे समितीचे चीफ कॉर्डिनेटर IAS डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नागसेवन औरंगाबाद येथे ऐतिहासिक धम्मपरिषद झाली. ही आंतराष्ट्रीय धम्मपरिषद केवळ देशातच नाही तर विदेशात ही सकारात्मक ऊर्जेचा विषय बनली आहे.

दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पूज्य भदंत सदानंद महास्थविर सदधम्मादित्य संघानुशासन अखिल भारतीय भिख्खु संघ आणि उपस्थित भिक्खू संघांतर्फे वंदन करून या जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा प्रारंभ झाला. त्यानंतर आधुनिक जगात बौद्ध धम्माची प्रसंगीकता या विषयावर पूज्य भंते यांच्या तर्फे धम्मदेसना देण्यात आली.

या आंतराष्ट्रीय धम्मपरिषदेचा दुसरा दिवस अर्थात दिनांक 2३ नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पूज्य भंते यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान साधना करण्यात आली आणि मानसिकता यावर धम्मदेसना देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात मलेशिया चे बौद्ध धम्मउपासक डॉ. तान हुन सून , डॉ बसंता, आणि डॉ.सिंह यांनी तरुण युवक युवतींना जागतिक बुद्धिजम आणि बुद्धिजम ची गरज , प्रज्ञा – शील – समाधी , मेडिटेशन या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी बौद्ध धम्माची मानसिकता आणि अभ्यास यावर धम्मदेसना देण्यात आली. देशविदेशातील बौद्ध धम्माच्या व्हिडीओ चे सादरीकरण करण्यात आले आणि बौद्ध धम्माचे पुनरुजीवन आणि मजबुतीकरणात आमची भूमिका ह्या बाबत धम्मदेसना देण्यात आली.

दिनांक 24 नोव्हेंबर एक धम्ममय पहाट, एक उभारी देणारी सकाळ, स्वतःच्या मनात एक ऊर्जा नवचैतन्य निर्माण करणारी ठरली कारण याच दिवशी आंतराष्ट्रीय धम्मपरिषदेत पूज्य भदंत जागतिक धम्मागुरू दलाई लामा ह्यांचे आगमन झाले. त्यांनी लाखो धम्मउपासक, उपसिकांना संबोधित केले तसेच मंगलमय मैत्री कशी असावी या बद्दल ही सांगितले. पूज्य भदंत दलाई लामा यांची धम्मदेसना सुरू असताना एक ते दीड लाख धम्मउपासक उपासीका सकाळी 9 ते 12 च्या उन्हातसुद्धा पूज्य भदंत दलाई लामा यांना ऐकण्यासाठी उपस्थित होते.

तसेच आदरणीय धम्मगुरु दलाई लामा यांच्या हस्ते www.dhammaedicts-block.com या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. आजपर्यंत आपला धम्मग्रंथ त्रिपिटक पूज्य भिक्कु संघ व सुज्ञ उपासकांनी हजारो वर्षांपासून सांभाळला आता यापुढील हजारो वर्षे तो असाच सुरक्षित रहावा म्हणून या वेबसाईडवर डिजिटलरित्या तो सुरक्षित करण्यात आला आहे.

जगभरातील मान्यवर भिक्कु संघ व महाउपासक डॉ. हर्षदीप कांबळे सर (IAS) महाउपासीका रोजना कांबळे मॅडम यांनी या वेबसाईटसाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी पूज्य भिख्खु संघाला चिवर दान करून या कार्यक्रमाचा समारोप झाला. लाखों धम्मउपासक, उपसिकांच्या उपस्थिती हा जागतिक धम्मसोहळा पार पडला. या धम्मसोहळ्यात आम्हाला धम्मसेवक आणि सेविका म्हणून काम करून समाधान मिळालेच परंतु पुढेही काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा नवचैतन्य मिळाले.

औरंगाबादच्या धम्मसेवकांनी डॉ. हर्षदीप सरांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बजावलेली चोख कामगिरी ही कौतुकास्पद आहे. ही धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. हर्षदीप सरांसोबत सर्व धम्मसेवक सेविकांनी अहोरात्र केलेले धम्मकार्य धम्मसेवा या मुळेच ही धम्म परिषद एक वेगळ्याच उंचीवर गेली. या धम्मपरिषदेत औरंगाबादच्या धम्मसेवक सेविकांसोबतच मुंबईचे धम्मसेवक आणि सेविकांनी अतिशय चोख भूमिका बजावली.

मुंबई आणि औरंगाबादच्या धम्मसेवकांत धम्ममैत्री प्रस्थापित झाली . आता आम्हा मुंबई वासीयांना औरंगाबाद हे आपलं शहर किंबहुना आता मुंबई आणि औरंगाबाद हे वेगळे नाहीच असे वाटू लागले आहे. ही एक प्रबुद्ध भारताच्या दिशेने होत चाललेली वाटचाल आहे. या आंतराष्ट्रीय जागतिक धम्मसोहळ्यात लहान मुलामुलींची संख्या व महिलांची संख्या सर्वाधिक होती.

या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे डॉ. हर्षदीप सरांचे बंधू हे 24 तारखेला सकाळी धम्मपरिषदेत आले असता. त्यांना आसनासाठी VVIP च्या ठिकाणी जागा नसल्यामुळे जिथे जागा उपलब्ध होती त्या जागेवर ते बसले होते. तसेच अनेक VVIP, VIP धम्मउपासक उपासिका हे जमिनीवर बसलेले पहायला मिळाले हे पाहून थोडं वाईट वाटलं परंतु आपल्याला आपल्याच कार्यक्रमात बसण्यासाठी जागा नाही याचं फार कौतुक वाटलं आणि हीच आपला कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडल्याची हीच पोचपावती आहे असे मला वाटते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद , मुंबई व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातील धम्मसेवकांनी विशेष आणि प्रामाणिक धम्मसेवा केली त्याबद्दल सर्वांचे आभार व अभिनंदन आपल्या मेहनतीला धम्माचे पंचरंग लाभले.

बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही धम्मपरिषद महत्वाची साखळी बनेल यात शंकाच नाही. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने तसेच IAS डॉ. हर्षदीप सरांनी आम्हाला एक नवीन ओळख देत अनोखी धम्मसेवा करण्याची संधी दिली. तसेच आम्हाला या ऐतिहासिक सोहळ्याचे भागीदार बनता आले यासाठी डॉ. हर्षदीप कांबळे सर आणि रोजना कांबळे यांचे आम्हा मुंबई,औरंगाबाद च्या सुपर कॉर्डिनेटर, व्हॉलेंटियर ,धम्मसेवक आणि सेविकांच्या वतीने विशेष आभार….त्रिपिटकाच्या वाचनासाठी सदर लिंक ला भेट द्या http://www.dhammaedicts-block.com

लेखनबंध – धम्मसेविका योगिता उबाळे

One Reply to “अभूतपूर्व जागतिक धम्मसोहळा आणि डॉ.हर्षदीप कांबळे

  1. Like the article of Madam Yogita Ubale,

    Wiii follow to visit the website of Dhammachakra.
    Thanks to IAS Dr. Kamble

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *