तथागत बुद्धाच्या शिकवणुकीनुसार जीवन पाच स्कंधामुळे बनलेले आहे. यात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या स्कंधाचा समावेश आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (उष्णता) , आणि वायू या चार धातूंपासून रूप बनलेले असून, याच भौतिक रूपांसोबत वेदना, सज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे चार मानसिक घटक जोडले आहेत. या नाम आणि रूपाच्या एकत्रीकरणातूनच जीवन बनलेले आहे. […]
या दिव्यत्वाच्या साक्षात्कारी मार्गावरून तुम्ही प्रवास करीत आहात.हा प्रवास विलक्षण अलौकिक व खडतर आहे. मुख्य म्हणजे या प्रवासात लौकिक जीवनाला, आपल्या इच्छा-आकांक्षा, लालसा-वासना यांना दूर ठेवावे लागते. तेही समजून उमजून. बद्धावस्थेपासून जीवनमुक्तावस्थेकडे आपल्याला जायचे आहे, अर्थात या प्रवासात बुद्ध तुमच्या सोबत सदैव सावलीसारखा आहेच, तो तुमचा सांगाती आहे, सखा आहे. प्रथम पार्थिव अस्मितेला, बद्धावस्थेला समग्र […]
तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]