लेणी

गुजरात मधील जुनागढ बुद्ध लेणी समूहाबद्दल जाणून घ्या!

जुनागढ बुद्ध लेणी समूह, भारतातील गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात या प्राचीन बुद्ध लेणी आहेत. या बुद्ध लेण्यांना सहसा बुद्ध लेणी न म्हणता, कठीण खडकात कोरलेल्या खोली ज्या बुद्ध भिक्खुंसाठी राहण्यासाठी कोरलेली आहेत.

जुनागढ बुद्ध लेणी सम्राट अशोक कालीन असून या बुद्ध लेणी पहिल्या शतकात कोरलेल्या असाव्यात. जुनागढ बुद्ध लेणी प्राचीन असून आजही या बुद्ध लेणीचे अस्तित्व टिकवून आहे. या बुद्ध लेणीत भव्य स्तंभ आणि खोली कोरलेली आहेत. जुनागढ येथे बाबा प्यारे बुद्ध लेणी, उपरकोट बुद्ध लेणी कोरलेली आहेत.

जुनागढ बुद्ध लेणी समूह

उपरकोट बुद्ध लेणी ही बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणीचाच एक भाग आहे. ही बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणीच्या पूर्व दिशेला आहेत. उपरकोट बुद्ध लेणी जमिनीपासून ३०० फूट खोल असून दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात या बुद्ध लेणीचे कोरीव काम झाले आहे. या बुद्ध लेणी सातवाहन काळातील आहेत. उपरकोट बुद्ध लेणीत एक चैत्य आणि भव्य खोली बुद्ध भिक्खू यांच्या निवासासाठी तसेच ध्यान धारणेसाठी वापर केला जातो.

बावा प्यारा बुद्ध लेणी, या बुद्ध लेणी गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात आहेत. या बुद्ध लेणी जुनागढ बुद्ध लेणी समूह यांचाच एक भाग आहे. बावा प्यारा बुद्ध लेणीत बुद्ध आणि जैन या दोन्ही धर्मातील शिल्पकला दिसून येतात. या लेण्यात एक चैत्य आणि खोली कोरलेली आहेत. या बुद्ध लेणी जेम्स बुर्गेस यांनी शोधून काढल्या आहेत. जेम्स बुर्गेस हे ब्रिटिश पुरातनवस्तुशास्त्रीय अभ्यासक होते.

जेम्स बुर्गेस यांच्या या अभ्यासानुसार बौद्ध भिक्खू यांनीच या बुद्ध लेणी कोरलेली असून यात त्यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर जैनांनी या बुद्ध लेणी वापरण्यास सुरुवात केली.