बातम्या

अपार्टमेंटच्या बाजूला साफसफाई करताना तब्बल ३० फूट उंच बुद्धमूर्ती सापडली

दक्षिण-पश्चिम चीनच्या चोंगकिंगमधील निवासी संकुलात नुकतीच डोके नसलेली 30 उंच बुद्ध मूर्ती सापडली. एका अपार्टमेंटच्या ब्लॉक मध्ये असलेल्या उंच भागाजवळ झाडाझुडपांनी साफ सफाई करताना हजार वर्षांपूर्वीची ही भव्य मूर्ती समोर आली.

हा परिसर इमारतींनी वेढलेला असून झाडी आणि वेलींमुळे मूर्तीचा भाग झाकलेला होता. बुद्ध मूर्तीच्या समोरच्या ठिकाणी संपूर्ण निवासी अपार्टमेंट ब्लॉक आहेत. इमारतीचा परिसर स्वछ करण्याच्या उद्देशाने झाडे काढून टाकत असताना तेथील रहिवाशांना झाडांखाली एक भव्य मूर्ती दिसली. ते मूर्ती पाहून तेथील रहिवाशी चकित झाले.

अपार्टमेंटच्या याच ठिकाणी भव्य बुद्ध मूर्ती आढळली

शीर नसलेल्या या मूर्तीचे पोटावर दोन हात असून डाव्या पायाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. तेथील एक 60 वर्षीय रहिवाशाने असे सांगितले की, ‘मी लहान असताना येथे एक मूर्ती होती,’ ‘त्यावर डोके होतं पण नंतर त्याचं नुकसान झालं.’

अनेक वर्षांपासून या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या यांग नावाच्या दुसर्‍या रहिवाशाने एका वेबसाइटला सांगितले की, पुष्कळ वर्षांपूर्वी बुद्ध मूर्तीजवळ एक विहार देखील होते, परंतु १९८० च्या दशकात तेथे निवासी इमारती बांधल्या गेल्या तेव्हा ती तोडली गेली. यांग म्हणाले, ‘‘ हा बुद्ध पुतळा सुमारे एक हजार वर्षांपूर्वी तयार केलेला असल्याचे मी ऐकलं आहे. यानंतर चीनच्या सांस्कृतिक अवशेषांच्या स्थानिक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *