बातम्या

जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार

औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उद्या दि 22 नोव्हेबेर 2019 रोजी हेलिकॉप्टरने औरंगाबाद शहरातील भडकल गेट येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सायंकाळी साडेचार ते ५ वाजता यावेळेत पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे . त्यानंतर पवित्र नागसेनवन परिसरातील क्रीडांगणावरील धम्म परिषदेच्या स्थळावरही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अशी माहिती जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य संयोजक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांनी दिली.

सायंकाळी उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी 1000 महिला एका सुरत पंचशील, त्रिशरण म्हणणार आहेत. शहरात आणि मिलिंद महाविद्यालयाजवळ मनोवेधक आणि आकर्षक सेल्फी पॉईंट केले आहेत. नागरिकांनी तेथे सेल्फी काढण्यासाठी झुबड उडाली आहे.

तसेच 100 फूट लांब आणि सुमारे 50 फूट रुंद असे भव्ये स्टेज तयार केले असून त्याचे स्वरूप लक्षवेधी दिसत आहे. स्टेडियम मध्ये एका मंचावर आकर्षक बुद्धमूर्ती ठेवण्यात आली आहे तर परिसरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि दलाई लामा यांची उतुंग होर्डिंग येणाऱ्याचे लक्ष वेधून घेते आहे. सबंध शहर बौद्ध धम्म परिषदमय झालं आहे.

One Reply to “जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार

  1. This is auspicious day for all of us…. Having HH DALAI LAMA in city of aurangabad, learning more about the BUDDHA ,DHAMMA AND SANGHA….
    I personally thanking all team members for making this a professional event .
    Regards.
    Surendra Salve. (cordinator.)

Comments are closed.