ब्लॉग

आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यदान करणारा अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

भारतीय प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ प्रशासन अधिकारी आपल्या कर्तुत्वाने आज देशाच्या पटलावर लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून मान्यता प्राप्त झाले आहे. खरोखरच त्यांना भारताच्या हवाई दलात जायचे होते, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तेथे जाता आले नाही. मात्र पुढील काळातील त्यांचे कार्य आकाशालाही गवसणी घालणारे ठरले आहे.

एकेकाळी दुष्काळाचा जबड्यात अडकून पडलेल्या भंडारा सारख्या जिल्ह्यातील चिंचाळ या लहानशा गावात जन्मलेला मुलगा भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी आपली ताकद पणाला लावतो. आपलं आयुष्यच मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दान करून टाकतो. हे विलक्षणच आहे! एका प्राथमिक शिक्षकाच्या मुलगा आईंची इच्छा त्याने डॉक्टर व्हावं ,वयाच्या अकराव्या वर्षी भंडारा वरून सुमारे अकराशे किलोमीटर लांब असणाऱ्या सातारा सैनिक शाळेत प्रवेश घेतो. जीवनाची शिस्त याच ठिकाणी लागलेली. पुढे नागपूरला एमबीबीएस करण्यासाठी दाखल होतो.

दीक्षाभूमीच्या या शहरात परिवर्तन लढ्याची जुडल्या जातो. एमबीबीएस होऊन आपल्याच गृहजिल्ह्यात दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देतो. दोन वर्षात ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन त्यांना अस्वस्थ करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्माण करायचा असेल तर, आपल्याला योजना तयार करनाऱ्या, नियोजन करण्याचा अधिकार प्राप्त होणाऱ्या ठिकाणी गेले पाहिजे. आणि त्यासाठी आयएएस करावेच लागेल.

माणसाला लोकशाहीने दिलेले अधिकार प्रदान करून उन्नत आणि आधुनिक भारताची निर्मिती करण्याच्या स्वप्नानी त्याची झोप उडवीली. आणि 1997 च्या बॅचमध्ये ते आयएएस झालेत. माणसाने ठरविले तर तो काहीही करू शकतो,याचे जागते उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आधुनिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी धरण ,शेती, शिक्षण, उद्योग यांच्या उभारणीचा आराखडा बाबासाहेबांनी तयार केला, आणि संविधानात अंतर्भूत करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याची सोय करून ठेवली. सामाजिक न्यायाचा भक्कम पाया त्यांनी निर्माण करून ठेवला.

विशेष सांगायचे हे की, या सर्व विषयांना डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आपल्या आयुष्याची विषय पत्रिका बनवली. यासाठी ते रात्रंदिवस राबत आहेत व कष्ट घेत आहेत.आणि हेच त्यांचे स्वप्न आहे. समताधिष्ठित समाजनिर्मिती चे सुत्र भगवान गौतम बुद्धाच्या धम्मात आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दिक्षा दिली. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि सहा डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले.त्यांच्या धम्म कार्याचा वसा चालावीत मानवाला दुःख मुक्त करण्याचे आव्हानच होते, हे आव्हान देखील डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्वीकारले. ही जबाबदारी त्यांनी आपल्या सुविद्य पत्नी रोचना व्हॅनीच हर्षदीप कांबळे यांच्यासह स्वीकारली.

आज कार्याची भव्यता पाहायची असेल तर, औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धम्म प्रसारक केंद्र आहे. त्याला अवश्य भेट दिली पाहिजे. मला नमूद करताना आनंद होतो की, डॉ. हर्षदीप कांबळेनी मानवीकल्याणाच्या उद्धारांसाठी निळीप्रत आणि प्रयोगाची सुरुवात यवतमाळ मधून केली. सगळ्या शोषित घटकांना वंचित समाजाला एकाच वेळी एकाच विचार मंचावर आणण्याचे कार्य त्यांनी समतापर्वच्या माध्यमातून सुरू केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना अंतर्गत शेत जमिनीचे वाटप महाराष्ट्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यवतमाळमध्ये झाले. पुढे यवतमाळ वरून ते जिथे गेलेत,ज्या ही विभागात गेले, तो विभाग लोकाभिमुख करण्याचं काम त्यांनी केलं.

अन्न व औषधी प्रशासन असो, केंद्रीय सामाजिक न्याय विभागातील कार्य असो, की राज्याचे उद्योग आयुक्त म्हणून त्यांचे कार्य असो, त्यांनी आपल्या कर्तुत्वाची मुद्रा प्रत्येक ठिकाणी उमटविली आहे. एक माणूस किती भूमिका करू शकतो हे त्यांच्या अफाट इच्छाशक्तीवर अवलंबूनआहे.एकाच वेळी पारध्यांच्या बेड्यावर जाऊन तिथल्या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारा संवेदनशील माणूस आणि दुसऱ्या भूमिकेत इंटरनॅशनल ट्रेंड सेंटरचा दिशादर्शक अधिकारी डॉ. हर्षदीप यांची ही विविध रूपं थक्क करणारी आहे. माणुसकीच्या वाटेवरील दिशादर्शक दिलासाकेंद्र आहेत. त्यांच्या 50 वा वाढदिवस त्यांना उत्तुंग कार्यासाठी मनस्वी मंगल कामना!

हेमंतकुमार कांबळे, यवतमाळ

One Reply to “आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यदान करणारा अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

  1. डॉ हर्षदीप कांबळे सर याचे कार्य प्रेरणादायी व नव दिशा देणारे आहेत
    वाढदिवसा निमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *