जगभरातील बुद्ध धम्म

चीनमधील बौद्ध धर्माचा इतिहास: पहिले हजार वर्ष

बौद्ध धर्म जगभरातील अनेक देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये जपला जातो. चीनमध्ये महायान बौद्ध धर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्याचा इतिहास खूप लांब व समृद्ध आहे.

चीन देशात बौद्ध धर्म जसजसा वाढत गेला तसतसे चीनी संस्कृतीत बौद्ध धम्म रुजत गेला आणि चीन देशात बर्‍याच बौद्ध शाळा विकसित झाल्या.असे असले तरीही चीनमध्ये बौद्ध असणे नेहमीच चांगले नव्हते, कारण वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळात बौद्धांचा छळ झाला होता.

चीनमधील बौद्ध धर्माची सुरूवात

हान राजवंशाच्या काळात सुमारे २,००० वर्षांपूर्वी बौद्ध धर्म प्रथम भारतातून चीनला पोहोचला. साधारणतः इसवीसन पहिल्या शतकामध्ये पश्चिमेकडील सिल्क रोडच्या माध्यमातून व्यापाऱ्यांमार्फत चीनमध्ये बौद्ध धम्माची ओळख झाली होती.

हान राजवंश काळात चीन देशात खोलवर कन्फ्यूशियन धर्म रुजला होता. कन्फ्यूशियानिझम हा नीतिशास्त्र आणि समाजात सुसंवाद आणि सामाजिक व्यवस्था राखण्यावर भर दिला जातो. दुसरीकडे बौद्ध धर्माने वास्तवाच्या पलीकडे जाऊन सत्य मिळवण्यासाठी जीवन पद्धतीवर भर दिला. कन्फ्यूशियन धर्मीय हे चीन मध्ये प्रसार पावत असलेल्या बौद्ध धर्माशी फारसे अनुकूल नव्हते.

तरीही, बौद्ध धर्म हळूहळू पसरला. दुसर्‍या शतकात काही बौद्ध भक्खू – विशेषत: गंधारा येथील भिक्खू लोकासेमा आणि पार्थियन भिक्खूनी अन-शिह-काओ आणि अन-सुसान- संस्कृतमधील बौद्ध सूत्र आणि विविध भाषेत असलेले भाषांतर चिनी भाषेत अनुवाद करण्यास सुरवात केली.

उत्तर आणि दक्षिण राजवंश

इसवीसन २२० मध्ये हान राजवंशचा पाडाव झाला, ज्यामुळे देशात सामाजिक आणि राजकीय अनागोंदी झाली. चीन मधील अनेक राज्यांमध्ये विभागला गेला. खरं तर ३८५ ते ५८१ या कालावधीला उत्तर व दक्षिण राजवंशांचा कालावधी म्हणतात.

उत्तर चीनच्या बर्‍याच मोठ्या भागात मंगोल लोकांचे पूर्ववर्ती झियानबी जमातीचे वर्चस्व राहिले. बौद्ध भिक्खू हे आधीच खूप हुशार होते ते या “रानटी” जमातींच्या राज्यकर्त्यांचे सल्लागार बनले. इसवीसन ४४० पर्यंत उत्तर चीन एक झियानबी कुळाच्या खाली एकत्र झाला आणि त्यांनी उत्तर वेई राजवंश बनविले.

४४६ मध्ये वेई शासक सम्राट तैव्यूने बौद्ध धर्माला क्रूर पद्धतीने आणि दडपशाहीने संपवण्यास सुरुवात केली होती. त्याच्या राज्यातील सर्व बौद्ध विहार, ग्रंथ आणि कला नष्ट करत होता त्यासोबतच भिक्खूना फाशी देण्यात येत होती. त्याच्यापासून उत्तरेकडील संघाचा काही भाग अधिकारी आणि अंमलबजावणी पासून सुटला होता.

४५२ मध्ये तैवानू मरण पावला; त्याचा उत्तराधिकारी, सम्राट झियाओवेन यांनी दडपशाही संपविली आणि बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार सुरू केला, ज्यात युंगांगच्या भव्य बुद्धीमत्तेचे शिल्प समाविष्ट होते. लाँगमेन बुद्ध लेणीची पहिली शिल्पकला झियाओवेनच्या कार्यकाळ दाखवते.

दक्षिण चीनमध्ये एक प्रकारचा “सौम्य बौद्ध धर्म” शिकलेल्या चिनी लोकांमध्ये लोकप्रिय झाला आणि त्यांनी शिक्षण आणि तत्त्वज्ञान यावर जोर दिला. ज्यामुळे चीनमधील उच्चभ्रू समाज विद्वान बौद्ध भिक्खूसोबत जोडला गेला.

चौथ्या शतकापर्यंत चीनच्या दक्षिणेत जवळपास २००० बौद्ध मठ होते. इसवीसन ५०२ ते ५४९ पर्यंत राज्य करणारे लिआंगच्या सम्राट वूच्या काळात दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माच्या भरभराटीचा काळ होता. सम्राट वू धर्मनिष्ठ बौद्ध आणि मठांचे आणि विहारांचे उदार संरक्षक होते.

नवीन बौद्ध शाळा

चीनमध्ये महायान बौद्ध धर्माच्या नवीन शाळा उदयास येऊ लागल्या. इ.स. ४०२ मध्ये, भिक्खू आणि शिक्षक हूई-युआन (इसवीसन ३३६ -४१६)) यांनी दक्षिणपूर्व चीनमधील माउंट ल्यूशन येथे व्हाइट लोटस सोसायटीची स्थापना केली. ही बौद्ध धर्माच्या शुद्ध भूमी शाळेची सुरुवात होती.

सुमारे 500 वर्षात बोधिधर्म नावाचा एक भारतीय भिक्खू (इसवीसन ४७० ते ५४३) चीनमध्ये दाखल झाला. पौराणिक कथेनुसार बोधिधर्म हे लिआंगच्या सम्राट वू यांच्या राजवाड्यात काही दिवस राहिले होते. त्यानंतर त्यांनी उत्तरेकडच्या प्रदेशात म्हणजेच आताचे हेनान प्रांताचा प्रवास केला. झेंगझोऊच्या शाओलिन मठात, बोधिधर्मांनी बौद्ध धर्माची चान नावाची शाळा स्थापन केली, जे पश्चिमेला झेन नावाच्या जपानी नावाने ओळखले जाते.

तांग राजवंश (इसवीसन 618 ते 907) च्या काळात चीनमधील बौद्ध धर्माचा प्रभाव शिगेला पोहोचला. बौद्ध कलांची भरभराट झाली आणि मठ श्रीमंत आणि शक्तिशाली झाले. इसवीसन ८४५ मध्ये, जेव्हा सम्राटाने बौद्ध धर्माचे दमन करण्यास सुरूवात केली तेव्हा ४,००० पेक्षा जास्त बौद्ध मठ आणि ४०,००० विहार आणि तीर्थेस्थळे नष्ट झाली तेव्हा फुटीय कलह चव्हाट्यावर आला.

या दडपणामुळे चिनी बौद्ध धर्माला फटका बसला आणि दीर्घकाळ बौद्ध धम्माची घसरण सुरू झाली.चीनमध्ये बौद्ध धर्म पुन्हा कधीही इतका प्रबळ होऊ शकला नव्हता, जो तांग राजवंशाच्या काळात होता. तरीही एक हजार वर्षांनंतर बौद्ध धर्म पूर्णपणे चिनी संस्कृतीचा भाग झाला आणि कॉन्फुशियानिझम आणि ताओइझमच्या प्रतिस्पर्धी धर्मांवर त्याचा प्रभावही पडला.

लेखक – बार्बरा ओ ब्रायन ( या झेन बौद्ध असून व्यावसायिक आहेत, त्यांनी झेन माउंटन बौद्ध मठात शिक्षण घेतले असून त्या “रीथिंकिंग रिलिजन” च्या लेखिका आहेत.)

One Reply to “चीनमधील बौद्ध धर्माचा इतिहास: पहिले हजार वर्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *