लेणी

कृष्णधवल फोटोग्राफीचा इतिहास आणि ब्रिटिशांनी भारतातील बौद्ध लेणींचे काढलेले फोटो

१) सन १८८५ मधील भाजे लेणी

सन १८८५ मध्ये मळवली येथील भाजे लेण्याचे काढलेले सुंदर छायाचित्र

१८३९ साल हे प्रॅक्टिकल फोटोग्राफीचे जन्मवर्ष मानतात. कारण त्या साली नवीन शोधामुळे कॅमेराचा डब्बा (Box Camera) आटोपशीर झाला. कॅमेराचा एक्सपोजर मिनिटावरून सेकंदावर आला. नवीन केमिकल डेव्हलपर बाजारात आले. त्यामुळे फोटो प्लेट डेव्हलप करणे सुलभ झाले.

१८६२ मध्ये चार्ल्स शेफर्ड याने भारतात सिमला येथे पहिला फोटो स्टुडिओ उभारला. १८६४ साली कलकत्त्याला त्याची शाखा त्याच्या पार्टनरने उघडली आणि हळूहळू भारतात कृष्णधवल फोटोग्राफीचे पर्व सुरू झाले. याच काळात ब्रिटिशांनी लगेच बाजारात आलेल्या डब्बा कॅमेराचा वापर सुरू केला. भारतात असलेली पुरातन स्थळे, प्रार्थनास्थळे, लेण्या, राजवाडे, इमारती, ग्रुप यांचे फोटो काढले जाऊ लागले. म्हणूनच सन १८६० नंतर काढले गेलेले भारतातील पुरातन स्थळांचे फोटो आजही आपण पाहू शकतो.

२) सन १८६९ मधील अजिंठा लेणी

१८६५ व १८६९ साली अजिंठा लेण्यांचे घेतलेले छायाचित्र.

१८६० नंतर भारतात कृष्णधवल फोटोग्राफीचे पर्व सुरू झाले. आणि याच काळात डब्बा कॅमेराचा वापर सुरू झाला.सोबत १८६५ व १८६९ साली अजिंठा लेण्यांचे घेतलेले छायाचित्र. त्यावेळी लेण्यांसमोरील मार्ग देखील बुजल्याचे दिसते.

१८६५ व १८६९ साली अजिंठा लेण्यांचे घेतलेले छायाचित्र.

३) सन १८७० मधील सांची स्तुप

१८६० नंतर भारतात कृष्णधवल फोटोग्राफीचे पर्व सुरू झाले. त्यावेळी ब्रिटिशांनी भारतातील अनेक पुरातन स्थळांचे डब्बा कॅमेऱ्याने फोटो काढून ठेवले असल्याने त्यावेळची स्थिती ध्यानात येते. सांची स्तुपाचे प्रस्तुत छायाचित्र हे दिन दयाळ यांनी ब्रिटीश यांचेकरिता १८७० साली काढले.

प्रस्तुत छायाचित्र हे दिन दयाळ यांनी ब्रिटीश यांचेकरिता १८७० साली काढले.

सदर छायाचित्रावरून त्याकाळी कोणीही तेथे जात नव्हते हे ध्यानात येते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कमानीचे कोरीव काम केलेले दगड ढासळलेले असल्याने मार्ग बंद झाला आहे. शिक्षण नसल्याने लोंकामध्ये जागृती नव्हती. इतिहासच विसरला गेला असल्यानें आणि सर्व बहुजन समाजच गुलामगिरीचे ओझे वाहत असल्याने कोणालाही या अनमोल स्थळाचे महत्त्व माहीत नव्हते.

परंतु आता एकेकाळी विस्मरणात गेलेल्या धम्माचे पडघम पुन्हा वाजत आहेत. इंग्रजानी भारतात राज्य केल्यापासून बुद्ध चौफेर पसरल्याचे दिसून येत आहे. व पुढेही दिसून येईल.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

6 Replies to “कृष्णधवल फोटोग्राफीचा इतिहास आणि ब्रिटिशांनी भारतातील बौद्ध लेणींचे काढलेले फोटो

  1. धम्माच्या अभ्यासासाठी व इतिहासाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी ,प्रसार करणेसाठी उत्तम साईट आहे !
    धन्यवाद !!

  2. In fact , the ancient history of India is the Buddhist history. Unfortunately, nowadays efforts are being made to change it . There fore, it’s need of hour to bring the facts before the world. Thanks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *