इतिहास

किती ठिकाणी सापडले तथागतांच्या अस्थीचे करंडक?

गेल्या शंभर वर्षात पुराणवस्तुसंशोधकांनी तथागतांच्या अस्थी असलेले अनेक करंडक शोधून काढले आहेत. पण या जम्बुद्वीपातून बुद्धधम्माचा इतका लोप झाला होता की, त्या अस्थींचा स्वीकार करण्यास बरीच वर्षे एकही संस्था पुढे आली नाही.

कपिलवस्तु जवळ अस्थी करंडक

पिप्रिवाह येथील स्तूपात सापडलेलं अस्थी करंडक

इ.स १८९८ साली डब्लू.सी. पेपे (William Claxton Peppe) यांनी कपिलवस्तु जवळ पिपिरिवाह किंवा पिप्रिवाह येथील विटांनी बांधलेल्या स्तूपांतून तथागतांच्या अस्थी करंडक शोधून काढला. त्या अस्थी १८९९ साली ब्रिटिश सरकारने सयामच्या ( थायलंडच्या) राजाला सद्भावनेचे प्रतीक म्हणून भेट दिल्या. सयामच्या राजाला अस्थी अर्पण करतांना, त्यातील काही भाग सिलोन आणि ब्रह्मदेशातील बौद्ध संघाला द्यावा अशी विनंती करण्यात आली होती.

पेशावरजवळील स्तूपात अस्थी करंडक

पेशावरजवळील स्तूपात सापडलेलं अस्थी करंडक

सर जॉन मार्शल यांनी पेशावरजवळील स्तूपात तथागतांच्या अस्थी असलेला करंडक शोधून काढला. १९२० मध्ये कलकत्याच्या दरबार हॉलमध्ये भरवलेल्या एका भव्य समारंभात त्या अस्थी त्या वेळच्या व्हाईसरॉयने ब्रह्मदेशातील बौद्ध संघात अर्पण केल्या. राजपुत्र पिश्मन याने ब्रह्मदेशातील बौद्ध संघातर्फे त्या अस्थींचा स्वीकार केला.

तक्षशिलाजवळ स्तूपात अस्थी करंडक

तक्षशिला स्तूप

तक्षशिलाजवळ असलेल्या धर्मराजिका स्तूपात सापडलेल्या तथागतांच्या अस्थी ब्रिटिश सरकारच्या वतीने सर जॉन मार्शल यांनी दि.३ फेब्रुवारी १९१७ रोजी श्रीलंका मध्ये जाऊन सिंसली बौद्ध संघाला अर्पण केल्या. त्या कॅन्डी येथील मालीगावा या विहारात प्रस्थापित केल्या आहेत.

आंध्रप्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यात अस्थीचे दोन करंडकांचा शोध

आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात तथागतांच्या अस्थीचे सापडलेले दोन करंडक

इ.स. १८९१ साली रे साहेबांनी आंध्रप्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यात तथागतांच्या अस्थी असलेल्या दोन करंडकांचा शोध लावला. त्या करंडकाशेजारी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील तथागतांच्या अस्थीसंबंधी शिलालेख होते. शोध लावल्यापासून १९२० पर्यंत ते करंडक मद्रास येथील म्युझियममध्ये ठेवले होते. १९२० साली ते सभारंभपूर्वक कलकत्याच्या महाबोधी सोसायटीला अर्पण केले.

सोपारा येथील स्तूपात भिक्षापात्र सापडले

सोपारा येथील स्तूपात तथागतांचे भिक्षापात्र सापडले

इ.स. १८८२ साली सोपारा येथील स्तूपात सापडलेले तथागतांच्या भिक्षापात्राचे अवशेष अजूनही मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये(छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्राहलय आहेत.

7 Replies to “किती ठिकाणी सापडले तथागतांच्या अस्थीचे करंडक?

  1. एक अस्थीकलश कोल्हापूर महाराष्ट्र येथेही सापडल्याच डाॅ सुभाष देसाई सांगतात

  2. The antiquity and bone relics need to protect and it’s information need to share whenever it put for display for general public

  3. खूप छान माहिती मिळाली, सर्वांना जयभीम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *