एकदा असं घडलं…राजा बिंबिसार तथागत बुद्धांना भेटण्यासाठी आले होते. ते आसनस्थ झाले. नंतर ते तथागत बुद्धांशी बोलू लागले, तेवढ्यात एक वृद्ध भिक्खू तेथे आला, नतमस्तक झाला. तथागत बुद्धांनी त्या वृध्द भिक्खूला विचारले ‘आपले वय काय’?
वृद्ध भिक्खू उत्तरला ‘भंते, नुकतच चौथं संपलंय’.
राजा बिंबिसाराचा आपल्या डोळयांवर व कानावर विश्वास बसेना. हा म्हातारा भिक्खू, जास्त नाही तरी ऐंशीच्या जवळपास वाटतो. आणि वर म्हणतोय की, मी चार वर्षाचा आहे.
राजा म्हणाला, ‘क्षमा करा भंते, आपण काय म्हणालात ते पुन्हा एकदा सांगाल काय?
ते वृद्ध भिक्खू म्हणाले, ‘वय वर्ष चार फक्त’.

तथागत बुद्ध हसले आणि म्हणाले, ‘आम्ही वय कसे मोजतो ते आपणांस समजणार नाही, हे चार वर्षापासून भिक्खू झालेत. चार वर्षच झालीत त्यांना दिक्षा घेऊन. ते आतून बदललेत त्याला चार वर्ष झाली. त्यांनी नदीचा एक किनारा सोडून, आता ते दुसर्या किनार्याला लागलेत. त्यांचे वय ऐंशी वर्षाचे आहे. परंतु ते वय आम्ही मोजत नसतो. खरे तर ते मोजण्याच्या लायकीचे नसते. खर वय भिक्खू झाल्यानंतरच सुरू होते. म्हणून या माझ्या भिक्खूचं वय चार वर्ष आहे.
I like
खूप सुंदर माहिती
खरोखरच आनुसरण्या सारखे तथागतांचे तत्वद्न्यान