बातम्या

जगभरातील सध्याच्या धर्मावर आधारित हिंसेमुळे मी व्यथित : दलाई लामा

औरंगाबाद : मी स्वतः भारताच्या तीन हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन अश्या तत्वज्ञानाचा प्रचारक समजतो .या तत्वज्ञानांतील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडवली जात आहे याचे मला दुःख होते औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यानिमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांचे काल सकाळी औरंगाबाद येथे आगमन झाल्यानंतर आज सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी राज्याचे उद्योग सचिव तथा जागतिक धम्म परिषदेचे मुख्य आयोजक डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्यासह डॉक्टर अरविंद गायकवाड, यशवंत भंडारे हेही उपस्थित होते .

भारताच्या 3000 हजार वर्षापूर्वीचा प्राचीन विचारात दिलेल्या शिकवणीनुसार अहिंसा आणि करून आला महत्त्व दिल्यामुळे मानव मानवातील द्वेषाला इथे थारा नाही. परंतु सध्या जगभरात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा घडवली जात आहे . याबाबतची दृश्य टीव्हीवर पाहताना मला अतिव दुःख होते , असे सांगून दलाई लामा म्हणाले की धर्माच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिश्चन इस्लाम यांना त्रास दिला जातो. माझ्या दृष्टीने व्यथित करणारी बाब म्हणजे बर्मा मध्ये बोद्धाकडून मुस्लिमांना तर इस्राईलमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांना तर इजिप्तमध्ये सिया सुन्नी वरून धार्मिक हिंसा घडवलीत जात आहे.

मोहम्मद पैगंबरांनी सहाशे वर्षापूर्वी करुणा आणि शांततेची शिकवण दिली आजही ही तेच मोहम्मद आहेत त्यांची तीच करूना आहे आणि तीच पाच वेळा केली जाणारी प्रार्थना आहे तरीही ही हिंसा का याचा विचार करण्याची ची गरज आहे म्हणून मी ज्या ज्या देशात जातो तेथे करुणा आणि अहिंसेचे महत्व सांगत असतो कारण कोणताही ही धर्म माणसाला मारण्याची परवानगी देत नाही या पार्श्वभूमीवर भारतातील 3000 हजार वर्षापूर्वीच्या संस्कृतीची आठवण होते या संस्कृतीचा प्रचार करण्याची गरज आहे.

जागतिक धर्मगुरू दलाई लामा पत्रकारांशी संवाद साधताना. (छायाचित्र : पंकज कहाळेकर)

आधुनिक शिक्षणातून भौतिकवादी माणूस घडवला जातो आहे. त्यांच्यामध्ये अध्यात्मिकता नाही. त्यांच्यात करुणा आणि अहिंसेचा आभाव दिसून येतो . भारतीय समाजाचेही तसेच झाले आहे ब्रिटिश कालीन शिक्षणातून भौतिक प्रगतीच्या अनुषंगाने माणूस शिकत गेला परंतु त्याच्यामध्ये मानवतावादी बुद्धांच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा आणि अहिंसा मानवतावाद यावरील भारतीय प्राचीन तत्वज्ञानातील शिक्षण देण्याची गरज आहे, असे सांगून दलाई लामा म्हणाले, केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणूस घडणार नाही माणसाला धर्मातील मानवी कल्याणाची मूल्य अंगीकारावी लागतील. केवळ बुद्धम् शरणम् गच्छामि म्हणून हे मूल्य प्रत्यक्षात येणार नाही.

मी एकदा लडाख मध्ये असताना तेथील एका स्थानिक ईमामा यांनी सांगितलेले विचार मौलिक वाटतात, ते म्हणाले होते ” मी प्रथम अल्ला वर प्रेम करतो नंतर अल्लाने निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रेम करतो ” हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे . सबंध जगाला एकत्र ठेवायची असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे . धर्मही ही वैयक्तिक बाब समजून सबंध मानवजातीला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारी व्यवस्था आवश्यक आहे. बुद्धाची ही शिकवण आहे भारताची लोकशाही ही याच विचारावर आधारित आहे, असेही ते म्हणाले.

मानवजातीला मनः शांतीची गरज आहे , असे बुद्ध सांगत असत . आज वैज्ञानिकही तेच सांगत आहेत. समाजातील वैयक्तिक व्यवहार हे मानवतावादी असल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते असे सांगून जगभरातील बौद्ध धर्मीयांचा तत्वज्ञानाचा मूळ आधार काय आहे हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले संस्कृत भाषेतील आधारित बौद्ध तत्वज्ञानाचा वापर मंगोलिया, तिबेट,चीन, व्हीयतनाम, कोरिया आणि म्यानमार या देशात केला जातो तर मूळ पाली भाषेतील तत्वज्ञानावर आधारित बौद्ध धर्माचे झालं थायलँड, श्रीलंका, बर्मा, कंबोडिया आदी देशात केले जाते. बुद्धाचे विचार आणि तत्वज्ञान हे मूळ पाली भाषेतच आहे,असेही दलाई लामा म्हणाले.

कर्मापा बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कर्मापा यांनी मिळवलेल्या ज्ञानाचे, अभ्यासाचे कौतुक केले परंतु ते आता संभ्रम निर्माण करणारे विचार व्यक्त करीत आहेत . धर्मही व्यक्तिकेंद्रित व्यवस्था नाही बुद्धालाही ते मान्य नव्हते बुद्धाने स्वतः होऊन आपल्या अनुयायांना सांगितले होते ते म्हणजे ” माझे विचार सारासार विचार करून पटले तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या ” असे सांगितले होते शिक्षण आणि अभ्यासातून बुद्धधम्माचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांना सांगणे हीच बुद्धाची शिकवण आहे बुद्ध धम्मात आत्म्याला स्थान नाही पण ज्ञानाला स्थान आहे त्यामुळे बुद्ध कधीही ही आत्मा आणि अनात्मा या विवादात पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील बौद्ध धर्मातील पुनर स्थापने मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. 1956 ला त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्मात आणलेत समतेचा पुरस्कार करणारे आणि जातीवर आधारित भेदभावपूर्ण व्यवस्था नाकारणारे ते महान नेते होते. त्यांनी जातीवर आधारित वरील वर्गाच्या लोकांनी खालच्या जातीवर राज्य गाजवणारी व्यवस्था कालबाह्य असल्याचे सांगितले.

मला भारतीय लोकशाहीचे कौतुक वाटते येथे स्वतंत्र आहे जगात पहिल्या क्रमांकाची ची लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये ते स्वातंत्र्य नाही. मी स्वतःला भारतीय मानतो कारण मी गेल्या साठ वर्षापासून या देशात राहतो. मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ चपाती ने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे( आय एम सन ऑफ इंडिया) , असेही दलाई लामा म्हणाले.