गुजरात मध्ये साबरकाठा जिल्ह्यात ‘देव नी मोरी’ या गावाजवळ मातीचे उंच ढिगारे होते. १९५० मध्ये येथे स्तूप असावेत या अनुषंगाने हळूहळू उत्खनन सुरू झाले. व १९६३ मध्ये येथील उत्खननात स्तुप सापडला. व त्यात एक दगडी मंजुषा सापडली. त्या दगडी मंजुषा मध्ये छोटा नक्षीकाम केलेला करंडक मिळाला.आणि आश्चर्य म्हणजे त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.(दशबाला) मौल्यवान पूजनीय असा ऐवज पाहताच महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी पुरातत्व विभागाचे सारेच थरारले. अशा तर्हेने देव-नी-मोरी हे गाव बुद्धस्थळ म्हणून उदयास आले.
M.S.University, बडोदा येथील प्रोफेसर व्ही एच सोनवणे यांनी सांगितले की सध्यस्थितीत मेश्वो धरणामुळे हे स्थळ बाधित झाले आहे. यास्तव मिळालेला पवित्र अस्थींचा करंडक तलम कपड्यात गुंडाळून तो एका स्वर्णजडीत पेटीमध्ये ठेवण्यात आला असून ती पेटी बडोदा युनिव्हर्सिटी पुरातत्व विभागात सुरक्षित ठेवली गेली आहे. प्रोफेसर सोनवणे यांनी पुढे सांगितले की चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग यांच्या प्रवास वर्णनात वडनगर-विजयनगर येथील मोठ्या विहाराचा उल्लेख आलेला आहे. तेच हे देव-नी-मोरी ठिकाण असावे. त्याकाळी तेथे १३०० भिक्खू रहात आहेत असे म्हटले आहे.

या पवित्र स्थळाची आठवण म्हणून देव नी मोरी येथील दिल्ली-अहमदाबाद राष्ट्रीय हायवे जवळ गुजरात राज्य व International Buddhist Confederation यांच्या संयुक्त विद्यमाने ३५१ फुटांचा स्तूप उभारण्याचे काम चालू आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या बुद्धमूर्तीची उंची १५१ फूट आहे. १०० एकर जागेत हा स्तूप विकासित केला जात आहे. या पवित्र कामासाठी दक्षिण कोरिया, जपान व चीन उत्सुक होते. पण हे काम दोन चिनी कंपन्यांना बहाल करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी चीन देशाचा दौरा केला तेव्हा तेथील राष्ट्रप्रमुख जिनपिंग यांना देव-नी-मोरी येथील दगडी मंजुशेची प्रतिकृती भेट देण्यात आली. तथागतांच्या या पवित्र रक्षेचे मोल सिरिलंकेने जाणले असून त्यांनी महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी व गुजरात सरकारला त्या देणेबाबत कळकळीची विनंती केली आहे. पण देव-नी-मोरी येथील नवीन स्तूपाचे बांधकाम झाल्यावर तो पवित्र करंडक दर्शनासाठी तेथे ठेवण्यात येणार आहे असे जाणकारांनी सांगितले.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)
Very touching thing. Namo budhay
नमोbudhay.जय भीम
बुद्धं सरणं गच्छाम ,
धम्म सरणं गच्छामि
सघं सरणं गच्छामि
खूपच ऱ्हदयस्पर्ष. सहर्ष माहिती आहे
साधू,साधू,साधू