बातम्या

करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत

थायलंड येथील बौद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा पुढाकार

भारतावर करोनाचे महासंकट सुरु असताना मदतीसाठी थायलंड येथील बौद्ध भिक्षु आणि उपासक सुद्धा पुढे आलेले आहेत. यामध्ये थायलंड मधील प्रसिद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आज देशातील अनेक भागात करोनाचा प्रकोप वाढल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडत असून हॉस्पिटल्स, मेडिसिन्स, ऑक्सिजनची पुरवठा याचीही कमतरता होत आहे. ह्यासाठी जगभरात भारताची ओळख बुद्धभूमी म्हणून असल्याने बौद्ध राष्ट्रातील बौद्ध आता भारताची मदत करण्यासाठी पुढे येत आहे. उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे आणि त्यांचे थायलंड मधील मित्र परिवार यांच्या पुढाकारातून. भारतासाठी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर आणि 200 च्या जवळपास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत मिळणार आहे.

ह्या शिवाय भारताच्या करोनाविरोधातल्या लढ्यात थायलंड येथून पूज्य भन्ते जयासारो तथा त्यांचे उपासक आणि व्हॅनीच मॅडम हे जिथे बुद्धिस्ट क्षेत्रे आहेत, जसे बोधगया, राजगीर, नालंदा, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, नागपूर, औरंगाबाद ह्या ठिकाणी विहार आणि हॉस्पिटल्स ना 20-25 ऍम्बुलन्ससचे सुद्धा दान देणार आहेत. तर या मदतीच्या कार्यात समन्वयक म्हणून त्यांचे पती डॉ हर्षदीप कांबळे, उद्योग विभागाचे कमिशनर आणि सचिव, हे काम पाहत आहेत. ह्या बौद्ध दाम्पत्यांनी या संकटकाळात पुढे येऊन दान करून तथागत बुद्धांची शिकवण असलेली दानपारमिता दाखवून दिली आहे.

व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, हॉस्पिटल्ससाठी ऍम्बुलन्सस ह्या जीवनदान देणाऱ्या गोष्टी असून करोना काळात खूपच गरजेचे आहेत ह्या मदत सामुग्रीचा सर्वच गरजू लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे अनेक जण त्यांना साधुवाद देत आहेत. यापूर्वीही रोजाना व्हॅनीच कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील बुद्धिस्ट भिक्खू ट्रेनींग सेंटर उभारण्यासाठी मोठी मदत केली होती. त्यांच्याच मदतीने, भदंत बोधिपालो महाथेरो ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ हर्षदीप कांबळे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद येथील चौका येथे लोकुत्तरा महाविहार आणि भिक्खू ट्रेनींग सेंटर उभारण्यात आले आहे.

औरंगाबाद (चौका) येथील लोकुत्तरा महाविहार आणि भिक्खू ट्रेनींग सेंटर

रोजाना व्हॅनीच कांबळे आणि डॉ हर्षदीप कांबळे यांच्या सामाजिक आणि धम्म कार्याबद्दल महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना माहिती आहे. संकटकाळात कांबळे दाम्पत्यांनी दाखवलेली दानवृत्ती ही प्रत्येक बौद्ध बांधवाना आदर्श घेण्यासारखी आहे. हे कुशल कम्म म्हणजे धम्माचे आचरण कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहे.

आजच्या या प्रचंड स्वार्थी जगात बहुतांश लोक स्वतःच्या परिवारापलीकडे जगताना दिसत नाहीत. गेल्यावर्षीच डॉ. हर्षदीप कांबळे आणि रोजाना व्हॅनीच कांबळे यांनी समाजातील गरीब होतकरू व गरजवंत मुलामुलींच्या सर्वार्थाने संगोपनासाठी, आपलं स्वतःच मुलंच नको म्हणून प्रचंड आश्चर्यकारक, अविश्वसनीय निर्णय घेतला. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपले सर्वस्व समाजाला अर्पण करायचे म्हणून कांबळे दाम्पत्यांनी मोक्याच्या आणि महत्वाच्या पदावर राहून तसेच जगातले सर्व सुख उपभोगता येते याची कल्पना असूनही, आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या आहेत.

तथागत बुद्धाने ज्या दहा पारमिता पाळायला सांगितल्या त्यापैकी दान पारमिता ही फार महत्वाची आहे. त्यासोबतच प्रतीत्यसमुत्पाद ह्या तत्वज्ञानानुसार सर्व जग एकमेकांवर अवलंबून आहे. हा काळ एकमेकांना मदत करण्याचा आहे. बुद्ध विचारातून व आचरणातून दान पारमितेचे पालन करावे, ह्या सारखे कुशल कम्म नाही हाच संदेश हे आदर्श बुद्धिस्ट दाम्पत्य देत आहेत.

आपणही सर्वांनी पुढे येऊन एक दुसऱ्याला मदत करूया आणि असेच कुशल कम्म करून ह्या बुद्ध पौर्णिमेला तथागताला वंदन करूया अशीच विंनती आहे.

One Reply to “करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत

  1. Dr.Kamble sir is gem of our society, they are complete follower of Buddhism. A Heart beat of youth in India and abroad…we always proud of this couple forever…sadhu …sadhu …sadhu …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *