बातम्या

‘जम्मू’मध्ये पहिल्या बुद्धविहाराची स्थापना; डॉ हर्षदीप कांबळे यांच्याकडून ‘बुद्धमूर्ती’ दान

जम्मू : भारतातील जम्मू-कश्मीरमध्ये सम्राट अशोकाद्वारे बौद्ध धर्माचा परिचय झाला. सम्राट कनिष्काद्वारे त्याचा प्रसार करण्यात आला. दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उघडून बघितला तर जम्मू-काश्मीरमध्ये बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात बहरलेला होता. इतिहासातील अनेक आक्रमण आणि उलथापालथीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये बौद्धधम्म काही प्रमाणातच शिल्लक राहिला होता. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये बौद्ध धम्मक्रांतीची सुरुवात झाली असून जम्मू मध्ये कित्येक वर्षांनंतर बुद्धविहाराची स्थापना झाली आहे. विशेष म्हणजे या बुद्धविहाराला डॉ.हर्षदीप कांबळे (आयएएस) यांनी बुद्धमूर्ती दान दिली आहे.

भिक्खू संघसेना आणि डॉ हर्षदीप कांबळे

जम्मू मध्ये सम्राट अशोक बुद्धविहार उभारून ऐतिहासिक धम्मक्रांतीची सुरुवात झाली आहे. भिक्खू संघसेना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थिती रविवारी (8 डिसेंबर) बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी डॉ.हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी लड्डाख येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दान दिला होता. हिमालयाच्या कुशीमध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांचा पुतळा दिमाखाने त्यांच्यामुळे उभा आहे. ह्या लड्डाखच्या कार्यक्रमाला जम्मू येथील काही लोक आले होते. तिथून प्रेरणा घेऊन जम्मूतील लोकांनी हे विहार स्थापन केले आहे.

डॉ.हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी दान दिलेल्या लड्डाख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सोबत

सम्राट अशोक बुद्ध विहाराचे उदघाटन करताना डॉ.कांबळे यांनी, तिथे असलेल्या कठीण परिस्थिती मध्येही धम्माचे काम पुढे नेत असल्याबद्दल जम्मूतील लोकांचे खूप कौतुक केले आणि भारताच्या आधी बुद्धिस्ट असलेल्या प्रदेशात परत नव्याने बुद्ध रुजत आहे. हेच खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने खूप मोठे पाऊल आहे असे सांगितले. धम्माचे पालन केल्याने आपला सर्वांगीण विकास होतो असे सांगून, नुसती प्रार्थना नाही तर आचरण ही धम्माप्रमाणे हवे असे त्यांनी सांगितले.

डॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागात जाऊन प्रबुद्ध भारत करण्यासाठी मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद पार पडली असून जगभरातील १० देशातील बौद्ध भिक्खूसह लाखो बौद्ध बांधवानी या परिषदेचा लाभ घेतला. ह्या कार्यक्रमालाही जम्मूतील काही लोकं येऊन खूप प्रोत्साहित होऊन काम करायला लागले आहेत. त्यासोबतच ६ डिसेंबरला ‘भीमांजली कार्यक्रमात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त शास्त्रीय संगीतातून आगळीवेगळी आदरांजली देण्यात आली होती. डॉ हर्षदीप कांबळे अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवून धम्मचळवळ अधिक गतिमान करीत आहेत. त्यांच्या धम्म कार्याला धम्मचक्र टीम कडून सलाम…!

6 Replies to “‘जम्मू’मध्ये पहिल्या बुद्धविहाराची स्थापना; डॉ हर्षदीप कांबळे यांच्याकडून ‘बुद्धमूर्ती’ दान

    1. Very good work, Sir. We do appreciate your gesture and devotion towards Dhamma. Despite of being engaged in Government Job, you are managing both the assignment/स so nicely there- by keeping in view the social binding in mind. We are very much proud of you & your work.

  1. आयुष्यमान हो.
    आपण बाबासाहेब यांचे अपुर्ण कार्य पुर्णत्वास नेण्यास मनापासून कार्य करीत आहात.
    आपले मनापासून अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *