आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात ते बोलत होते.
India's contribution towards UN Peace-keeping missions has been immense. pic.twitter.com/rtmNyMZ2Bc
— PMO India (@PMOIndia) September 27, 2019
जगभरात आजही भारताची ओळख बुद्धांचा देश म्हणून आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असो की विचारधारेचे भगवान बुद्धांचे विचार जगाला सांगावे लागतात. त्यामुळेच म्हणतात ना..दुनिया में बुद्ध का नाम यह भारत की पहचान है!