बातम्या

पुरातन स्थळांचे पावित्र्य जपा!

महाराष्ट्रातील पंधरा-सोळा मुलांचा ग्रुप बाईक वरून भूतानमध्ये गेला होता. तेथील थिम्पू ते पुनाखा या हिमालयातील रस्त्यावरील पर्वतराजित डोचुला पास आहे. या रस्त्यांवर १०८ स्तूप असून त्यांना स्थानिक भाषेत चॅर्तन म्हणतात.

या ग्रुप मधील एक अतिउत्साही ( अभिजित रतन हजारे) तेथील पवित्र स्थळ असलेल्या स्तुपाजवळील मनोऱ्यावर चढला. त्यामुळे स्थानिक लोकांचा त्यांच्यावर रोष झाला असून रॉयल भूतान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पवित्र बौद्ध स्थळाचा आदर न केल्याचा आरोप त्यावर ठेवला आहे. अभिजित हजारेने उत्साहाच्या भरात केलेले कृत्य निंदनीय आहेच पण त्यापासून इतरांनीही धडा घ्यावा असे वाटते. ज्या राज्यात किंवा देशात पर्यटनास आपण जातो तेथील संस्कृतीची थोडीफार जाण असावी. आणि त्याअनुषंगाने तेथील स्थळांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य आहे.

-संजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *