जगभरातील बुद्ध धम्म

या मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत सम्राट अशोकाचे शिलालेख

शाहबाझ गढी हे निसर्गरम्य गाव पाकिस्तान मधील मर्दन शहरापासून १२ कि. मी. अंतरावर आहे. आजूबाजूला हिरवीगार कुरणे, उशाला टेकडी, गावातून वहात असलेली नदी यामुळे प्राचीन काळापासून येथे प्रवासी थांबत असत.

याच गावात दोन मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत लिहिलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी हुएन त्संग जेव्हा इथे आला होता तेव्हा त्याने या गावचे नाव पो लौशाह असे असल्याचे नमूद केले आहे.तसेच या शिलालेखास UNESCO World Heritage यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

हे शिलालेख इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकात अशोक राजाच्या कारकिर्दीत खोदलेले आहेत. सम्राट अशोक हा जगातील पहिला असा सम्राट होता की ज्याने बुद्धांचा उपदेश स्वतः अंगिकारून आशिया खंडातील जनतेस सदाचाराचे धडे शिलालेखाद्वारे दिले.

शाहबाझ गढी येथील शिलालेखात सुद्धा माणसाचे आचरण कसे असावे याचा सदुपदेश दिला आहे. जन्म, लग्न, आजारपण यावेळी करण्यात येणारे अंधश्रद्धाचे विधी बंद करावेत याबद्दलही शिलालेखात उल्लेख आहे. आईवडील, गुरू, वयस्कर यांचे प्रती आदर बाळगावा, सेवकांशी सहानुभूतीने वागून सर्वांप्रति मैत्री भावना विकसित करावी असेही शिलालेखात म्हटले आहे. थोडक्यात बुध्दांच्या उपदेशाचे सार सम्राट अशोकाच्या शिलालेखातुन प्रतिबिंबित होते.

3 Replies to “या मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत सम्राट अशोकाचे शिलालेख

Comments are closed.