बुद्ध तत्वज्ञान

ह्याच जन्मी दुःखाचा अंत करणे संभवनीय आहे काय?

होय, एकदा भगवान राजगृहात गृध्रकूट पर्वतावर विहर करीत होते. अनेक जैन साधू ऋषिगिरीच्या कला-शिलेवर आसनाचा त्याग करून, उभ्या उभ्या नाना प्रकारचे कष्ट सहन करताना त्यांना दिसले. त्यांनी त्या साधूना विचारले, “भिक्खुनो! काय तुम्ही निश्चयपूर्वक जाणता की, या जन्मापूर्वी तुमचे अस्तित्व होते? असे नव्हे की, ते नव्हतेच!”
“आयुष्मान! नाही.”

भ. बुद्धांनी विचारले, “भिक्खूनो! काय तुम्ही जाणता की, तुम्ही पूर्वजन्मी निश्चितपणे पापकर्म केलेच आहे, असे नव्हे की, केलेच नाही?
“आयुष्मान! नाही.”

भगवंतांनी विचारले, “भिक्खून काय तुम्ही जाणता की, एवढा दुःखनाश झाल्याने सर्व दुःखांचा नाश होईल?
”आयुष्मान! नाही.”

अशा प्रकारे भगवंतांनी दावून दिले की, पूर्वजन्माविषयी काहीच माहीत नसताना, त्याच्या आधारावर आणि भावजन्माविषयी काहीच माहीत नसताना त्याच्याही आधारावर जी जीवन चर्चा निश्चित केली जाते, ती वाळूच्या भिंतीसारखी निराधारच असते.

One Reply to “ह्याच जन्मी दुःखाचा अंत करणे संभवनीय आहे काय?

Comments are closed.