जगभरातील बुद्ध धम्म

पाचूची मौल्यवान बुद्धमूर्ती ऑस्ट्रेलिया देशाची शान होणार

ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्न पासून १६० कि.मी. अंतरावर बेंडिगो शहराजवळ महाकाय स्तुप उभारण्याचे काम चालू आहे. हा स्तुप तिबेट मधील १५ व्या शतकातील ‘ग्यानटसे’ स्तुपाची प्रतिकृती आहे. या स्तूपाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची उंची ५० मी. असेल.

या स्तुपातील मुख्य बुद्धमूर्ती ही २००३साली व्हॅनकुअर ( कॅनडा ) येथील खाणीत सापडलेल्या अखंड जेड (हिरवा मौल्यवान दगड) पासून एका थाई शिल्पकाराने घडविली असून तिचे वजन ४ टन आहे. तसेच धर्मगुरू दलाई लामा यांनी दिलेली महाबोधी विहारातील बोधिवृक्षाची एक फांदी येथे रुजविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बर्मा, चीन, मंगोलिया येथून प्राप्त झालेल्या बुद्ध अस्थी कुपी येथे ठेवण्यात आल्या आहेत.

पाचू दगडातून घडवीलेल्या बुद्धमूर्तीच्या शांती स्तूपाचे ऑस्ट्रेलियामध्ये बांधकाम

हिरव्या पाचूची २.५ मी. उंचीची बुद्धमूर्ती आणि स्तूपाचे बांधकाम बघण्यास चीन, भारत, जपान, थायलंड, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया मधून आत्ताच पर्यटक येत आहेत. या स्तुपाचा एकूण खर्च १४ मिलियन डॉलर्स आहे. काही वर्षांत हा पूजनीय स्तुप जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो नक्कीच ऑस्ट्रेलिया देशाची शान असेल.