लेणी

महाराष्ट्रात या ठिकाणी २००० वर्षे प्राचीन बौद्ध लेण्या

जुन्नरच्या परिसरात जवळ जवळ ४०० बौद्ध लेणी आहेत. ती इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून इसवी सनानंतर तिसऱ्या शतकापर्यंत खोदली गेली असली पाहीजेत. इसवी सनानंतर तिसऱ्या शतकानंतर तेथे लेणी खोदण्याचे काम झालेले दिसत नाही. बहुतेक लेणी अत्यंत साधी असून एकेका खोलीची भिक्खूगृहे आहेत. जुन्नर पासून पाच किलोमीटर अंतरावर लेण्याद्री बौद्ध लेणी आहेत.

या बौद्ध लेणी २००० वर्षे प्राचीन असून येथे ३० बौद्ध लेणीचा समूह आहे. जुन्नर येथे नारायन गाव जुन्नर रोड येथे अंबा-अंबिका नावाची बौद्ध लेणी आहे. जुन्नर जवळपास एका टेकडीवर भूतलिंगा नावाची २००० वर्षे प्राचीन बौद्ध लेणी आहेत.

जुन्नर जवळील ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनेरी येथे तळजा बौद्ध लेणी आहेत. मानमोडी बौद्ध लेण्यांचा समूह येथे भिमाशंकर नावाची २००० वर्षेप्राचीन बौद्ध लेणी आहे. भिमाशंकर बौद्ध लेण्यांत एक चैत्य आणि स्तूप आणि विहार आहेत. जुन्नर जवळील टेकडीवर किल्ला आहे ज्याचे नाव शिवनेरी किला आहे . येथे बौद्ध लेणी असून बौद्ध लेणीवर असलेल्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *