लेणी

कान्हेरी बौद्ध लेण्यांचे चीन जपानचे कनेक्शन?

कान्हेरी बौद्ध लेण्यांतील दृश्य मुंबई जवळील एका बेटावरील या बौद्ध लेणी आहेत.या बौद्ध लेणी २००० वर्षे प्राचीन असून महाराष्ट्र राज्याला लाभलेला हा वारसा आहे. कान्हेरी पर्वताचे नाव तेथील एका शिलालेखांत ‘कान्हासील’ असे दिले आहे. कान्हेरीला ‘कान्हागिरी’ किंवा ‘कृषगिरी’ असेही म्हटले आहे. येथे एकूण १२८ लेणी आहेत. १०७ विहार आणि ५ चैत्यगृह आहेत. इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन नंतर ११ व्या शतकापर्यंत म्हणजे तेराशे वर्षे या लेणी तयार करण्याचे काम चालू होते.

कान्हेरी इसवी सन पूर्वी २०० वर्षांपासून इसवी सनानंतर १३ व्या शतकापर्यंत म्हणजे जवळ जवळ १५०० वर्षे भरभराटीस आलेले बौद्ध विश्वविद्यालय होते.

कान्हेरी लेणी बोरीवली येथील लेणी समुहात ही अवलोकितेश्वर पद्मपाणी बोधिसत्वाची मुर्ती आहे. महायानातील माध्यमिक पंथाचे आचार्य नागार्जून ह्यांनी प्रतित्यसमुत्पादाच्या ( निदानचक्राच्या ) बारा कड्याची नव्याने स्पष्टीकरण केले. महायानी पंथांनीच तथागतांच्या मानवी सद्गुणांनाच मानवी चेहरा दिलाय .लेणी शिल्पकला त्यांच्या प्रयत्नातूनच आकारात आलीय आणी बहारु लागली व संपन्न झालीय.

पद्मपाणी बोधिसत्व हा करुणेचे प्रतिक समजल्या जातो. तो जनकल्याणासाठी कायम पृथ्वीवर राहतो. त्याचे ध्येय निर्वाण मिळवणे हे नसून जनकल्याण करणे हेच असते. हा इ.स.पहिल्या शतकातील पद्मपाणी बोधिसत्वाचे बाबतीतला पहिला समज होता. तर चौथ्या पाचव्या शतकात तो समज अधिक विस्तृत झाला.

जनकल्याणासाठी या बोधिसत्वांला अनेक हात व डोके दाखवण्यात येऊ लागले. हजारो हात व अनेक डोके असणारे बोधिसत्व निर्माण झाले त्यांनाच अवलोकितेश्वर पद्मपाणी बोधिसत्व संबोधणे सुरू झाले चीन, जपान देशात या बोधिसत्वाच्या मूर्ती जास्त आहेत.पण त्यांचे मुळ भारतीय लेणीमध्येच आहे.हे कान्हेरी लेणीतील शिल्प याचा पुरावा आहे.


अवलोकितेश्वर पद्मपाणी या शिल्पाला ११ मुख आहेत

समुद्री व्यापारी व्यवसायामुळेच ही शिल्पकला भारताबाहेर गेली. कान्हेरी लेणीत चिनी लिपीत दोन शिलालेख देखील मिळाले आहेत. याचा अर्थ चिनी विद्यार्थी आणि अध्यापक असणारे भिक्षू येथे राहात होते. त्याचा स्पष्ट पुरावा आपणास मिळतो.या शिल्पाला ११ मुख आहेत. याला १२ मुख पुर्वी असावीत एक मुख कालौघात नष्ट झाले असावे ..प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्यांचा असतो.

One Reply to “कान्हेरी बौद्ध लेण्यांचे चीन जपानचे कनेक्शन?

Comments are closed.