बातम्या

मनूच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या औरंगाबादच्या दोन ‘मर्दानी’

राजस्थान राज्यातील जयपूरमधील राजस्थान हायकोर्टाच्या समोर उभा असलेल्या मनुच्या पुतळ्याला ८ ऑक्टोबर २०१८ भर दिवसा दोन महिलांनी काळे फासले होते. मनुच्या तोंडाला काळे फासणाऱ्या त्या दोन ‘मर्दानी’ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील आहेत. औरंगाबादमधील शंभूनगर झोपडपट्टीतील एका खोलीच्या घरात राहणाऱ्या कांताबाई अहिरे आणि दुसऱ्या वंजारी समाजाच्या शीला पवार या दोघींनी केलेला धाडसी निषेध म्हणजे एक क्रांतिकारी घटना होय.

दिल्ली येथे इक्वालिटी फाउंडेशन (आझाद सेना) आणि आरक्षण विरोधी पार्टी या दोन जातीयवादी संघटनांकडून ऑगस्ट २०१८ मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली होती. सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संसदेलाही शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. हा व्हायरल झालेला व्हिडिओ औरंगाबाद येथील ४० वर्षीय कांताबाई अहिरे यांनी पाहिला आणि संतापाने त्यांचे रक्त सळसळले. हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या भारतीय राज्यघटनेची प्रत जाळल्यामुळे कांताबाई अस्वस्थ होऊन त्याचा निषेध करण्याचे ठरवले.

शीला पवार व कांताबाई अहिरे

कांताबाई अहिरे व शीला पवार ह्या दोघींनी थेट मनुवादी लोकांच्या मुख्य स्रोतावरच हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयपूरमधील राजस्थान हायकोर्टाच्या समोर उभा असलेल्या मनुच्या पुतळ्याला काळे फासण्याचे ठरवले. औरंगाबादहून त्यांनी रेल्वेने दिल्ली येथे पोहचले. तिथून त्या ८ ऑक्टोबर रोजी जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारात पोहोचल्या.

मनूच्या पुतळ्या समोर फक्त निदर्शने करण्याचे ठरले मात्र पुतळ्याजवळ पोहचताच त्यांचे रक्त अजून खवळले. त्या दोघींची निदर्शने न करता मनूच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय. सुरुवातीला पुतळ्याच्या कठड्यावर शिला पवार ह्या चढल्या कठडा खूप उंच होता. त्या दिवशी सोमवार असल्याने कोर्टात मोठी गर्दी होती. तसेच दोन महिला पुतळ्याजवळ साफसफाई करत असल्याचे सर्वांना वाटत होते. मात्र शिला पवार यांनी मूर्तीच्या तोंडावर काळा रंग लावला त्यानंतर कांताबाई सुद्धा पुतळ्याच्या कठड्यावर चढल्या आणि जोरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो…अश्या घोषणा द्यायला सुरुवात केली. हायकोर्टाच्या आवारातील सर्व वकील, कर्मचाऱ्यांचे लक्ष पुतळ्याकडे गेले.

मनूच्या पुतळ्यासमोर गर्दी जमली. दोन महिला पुतळ्याच्या कठड्यावर थांबून बाबासाहेबांचा जयघोष करत होत्या..तर मनूच्या पुतळ्याच्या तोंडाला काळा रंग फासला होता. हे पाहून तेथील मनुवादी वकील खवळले. त्या दोघींना पुरुष वकिलांनी घेराव घातला. पुतळ्याला काळे का फासले हे विचारले. या दोघींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यांना खाली उतरण्यास सांगितले, मात्र त्यांनी महिला पोलीस आल्याशिवाय सोबत येणार नसल्याचे सांगितले. महिला पोलीस आल्यानंतर दोघींना अटक करण्यात आली.

पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या दोघींनी न घाबरता आम्ही भारतीय राज्यघटनेच्या प्रति जाळण्याच्या निषेधार्थ पुतळ्याला काळ रंग लावल्याचे सांगितले. या कृत्याबद्दल दोघींनाही दोन आठवडे तुरुंगात काढावे लागले. स्थानिक दलित वकिलाने घेतलेल्या जामिनावर त्यांची सुटका झाली असली तरी खटला अद्याप प्रलंबित आहे.

म्हणून पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय :

ह्या सर्व घटनेबद्दल धम्मचक्र टीमशी बोलताना कांताबाई अहिरे म्हणाल्या की, आज भारतीय राज्यघटनेची प्रत जाळण्यानंतर आम्ही शांत राहून नुसती निदर्शने करत उभ्या राहिलो, तर आमच्या निषेधाकडे कोणाचेही लक्ष जाणार नाही हे आम्हाला माहीत होते. राज्यघटनेची प्रत जाळणाऱ्यांना आम्ही विरोध केला नाही, तर त्यांचे धैर्य वाढेल याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय केला,” आम्हला आमच्या जीवाची पर्वा नव्हती. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. “मनू हाच मनुस्मृतीचा लेखक आहे असे त्यांच्या पुराणानुसार मानले जाते. शूद्रांच्या, स्त्रियांच्या शोषणाचा पाया त्याने घातला. असे असताना त्याचा पुतळा उच्च न्यायालयाच्या आवारात स्थापन केला जाणे धक्कादायक आहे, म्हणून आम्ही असा निषेध केला आहे.

मनूच्या पुतळ्याला काळे फासल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली तरीही त्या दोघींवर लावलेले फौजदारी आरोप कायम आहेत. आज त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाही त्यांच्यातील बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत. त्यांच्या या धैर्याला आणि संघर्षाला धम्मचक्र टीमकडून सलाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *