इतिहास

१८६१ साली रेल्वेमार्गाचे काम करताना सापडलेल्या सुलतानगंज बुद्धमूर्तीचा इतिहास जाणून घ्या!

५ व्या शतकातील तांब्याची भव्य मूर्ती इंग्लंडमध्ये बरमिंघम येथील म्युझियममध्ये दर्शनार्थ आहे.

१८६१च्या सुमारास East India Railway चे रेलमार्ग बांधण्याचे काम बिहारमध्ये भागलपुर जिल्ह्यात सुलतानगंज येथे चालू होते. तेव्हा ब्रिटिश रेल्वे इंजिनिअर हॅरीस याला जमिनीमध्ये खणताना धातूच्या मूर्तीचे पाय दिसले. त्याने मजुरांकडून हळुवार ती मूर्ती खणून काढली आणि तो चकित झाला. ती २.३० मी. उंचीची व ५०० किलो वजनाची तांब्याची बुद्धमूर्ती होती. मूर्तीचा उजवा हात अभयमुद्रा मध्ये व डावा हात अनुमोदन स्थिती दर्शवित होता. इंग्लडमध्ये बरमिंघम येथे त्यावेळी नुकतेच आर्ट म्युझियम सुरू झाले होते. त्या म्युझियमच्या मालकाने लगेच ती मूर्ती इंग्लंडला पाठविण्यासाठी २०० पौंड हॅरीस यांना पाठविले व मूर्ती इंग्लंडला नेण्यात आली.

आजमितीस या गोष्टीस १५७ वर्षे झाली असून आजही ५व्या शतकातील ही तांब्याची भव्य मूर्ती इंग्लंडमध्ये बरमिंघम येथील म्युझियममध्ये दर्शनार्थ आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला शहरातील अनेक लोक या मूर्तीस वंदन करण्यासाठी येतात. अशावेळी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.ब्रिटिशांच्या काळात भारतातून अशा किती बुद्धमूर्ती जहाजाद्वारे परदेशात गेल्या आहेत याची कुठेही माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *