जागतिक धम्म परिषद नुकतीच औरंगाबाद येथे २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान पार पडली. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध धर्मगुरू दलाई लामा आले होते. आपल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले की ‘बुद्धाने कधीच म्हटलं नाही की मी निर्माता आहे. त्याने जे ज्ञान प्राप्त केले तसे ज्ञान कोणीही प्राप्त करून घेऊ शकतो. त्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गावरून मनुष्यप्राण्याने चालायचे आहे.’
ते पुढे म्हणाले की ‘या एकविसाव्या शतकात बुद्धिस्ट यांनीच फक्त त्याचा अभ्यास करायचा नसून सर्व मानव जातीने केला तर ते त्याच्या फायद्याचे आहे. या जगात दोन प्रकारचे भक्तजन असतात. एक फक्त बुद्धांप्रती श्रद्धा ठेवतो आणि दुसरा मात्र त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून प्रत्यक्ष चालतो. जर तुम्ही बुद्धावर नुसती श्रद्धा ठेवून बसलात तर बुद्धिझम टिकणार नाही. पण जर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चाललात तर मात्र बुद्धीझम अनंत काळ बहरलेला राहील.आणि यास्तव शिक्षण आवश्यक आहे. बुद्ध समजण्यासाठी ज्ञानी होणे आवश्यक आहे.’
– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
Absolutely correct we need to understand the way of Lord Buddha