जगभरातील बुद्ध धम्म

दक्षिण कोरियाने दीड हजार वर्षांपूर्वीचा दगडांचा पॅगोडा लोकांसाठी पुन्हा खुला केला

दक्षिण कोरियात दीड हजार वर्षांपूर्वी बिकजे राजवटीत इकसन मिरौसाजी नावाचा दगडी पॅगोडा बांधला होता. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. तेथील सांस्कृतिक वारसा मंडळाने त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले. त्यानुसार २००१ मध्ये त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. हे काम जवळजवळ १९ वर्षे चालले. व चार दिवसांपूर्वी दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी हा दगडी पॅगोडा लोकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

या पॅगोड्याची आता उंची १४.५ मी. असून रुंदी १२.५ मी. आहे. तसेच त्याचे वजन १८३० टन आहे. दुरुस्ती करताना एकएक दगड उतरविताना त्यानां तेथे सोन्याचा पत्रा सापडला. तेथील इतिहासकार सांगतात मूळ पॅगोडा जेंव्हा बांधला गेला तेंव्हा तो नऊ मजली होता. पण पडझड झाल्याने तो ६ मजली झाला आहे.

देशाचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी द.कोरियाने US$ २०.३ मिलियन एवढा खर्च केला आहे. आपल्या भारतात अनेक स्तुप खणून काढल्यामुळे ते ओबडधोबड झाले आहेत. त्यांचे नुतनीकरण का करण्यात येत नाही ? का ते असेच पडझड झालेल्या अवस्थेत कायम राहणार?

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *