बुद्ध तत्वज्ञान

जाणून घ्या! बुद्धांचे हे १० वचने

सर्व काही अनित्य आहे.
सर्व संस्कारीत (निर्मित) वस्तू अनित्य आहेत. हे जेव्हा एखाद्या प्रज्ञापूर्वक पाहातो तेव्हा तो सर्व दुःखाती अनासक्त होतो.

अविद्या
चार आर्य सत्यांना समजून न घेतल्यामुळे व त्यांचे आकलन न झाल्यामुळे आपण या दिर्घ आणि कंटाळवाण्या (दुःखदायक) अस्तित्वाच्या म्हणजे संसाराच्या फेऱ्यात धावत राहणार आहोत.

शुभ दिवस
मूर्ख मनुष्य शुभ दिवसाची वाट पाहत बसतो तर उद्योगी पुरूषासाठी प्रत्येकच दिवस शुभ असतो.

सांसारिक बंधन
सांसारिक बंधनातून चित्त (मन) विमुक्त होणे, यातच खऱ्या सुखाचे रहस्य दडले आहे.

अपुरे ज्ञान
अल्पश्रुत मनुष्य बैलासारखा वाढत राहतो. त्याचे मांस (शरीर) तर वाढते, परंतु त्याची प्रज्ञा वाढत नाही.

जीवन सर्वांनाच प्रिय आहे.
सर्वच शिक्षेला घाबरतात, सर्वच मृत्यूला घाबरतात. सर्वांना आपल्या सारखेच समजून, कोणीही कोणाला मारू नये किंवा मारण्यासाठी कारण बनू नये.

धम्म आचरण्यासाठी आहे.
हा धम्म एखाद्याने स्वीकारून पालन करण्यासाठी आहे. तो स्वीकारून केवळ विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्यासाठी नाही.

अकुशल कर्म करणारा शोक करतो.
अकुशल कर्म करणारा या लोकात शोक करतो. परलोकातही शोक करतो. तो दोन्ही लोकात शोक करतो. तो त्याच्या स्वतःच्याच अकुशल कर्मामुळे शोक करतो. अत्यंत क्लेश प्राप्त करतो.

अप्रमाद आणि प्रमाद (बेहोशी)
अप्रमाद अमृतपद आहे, निर्वानाचा मार्ग आहे, तर प्रसाद मृत्यूचा मार्ग आहे. अप्रमादी मनुष्य मरत नाही आणि प्रमादी मनुष्य तर आधीच मृत असतो, मृतवतच असतो.

खरा मूर्ख
मूर्ख मनुष्य जर स्वतःला मूर्ख समजत असेल तर तो तितक्या प्रमाणात तरी शहाणा आहे, परंतु खरा मूर्ख तोच आहे जो मूर्ख असूनही स्वतःला शहाणा किंवा बुद्धिमान समजतो.