बोधगया येथील बौद्ध जगताचे मोठे पवित्र स्थळ महाबोधी विहार लवकरच आधुनिक एलइडी लाईटिंग सिस्टीमने सुशोभित होऊन उजळण्यात येणार आहे. या नवीन लाईटिंग सिस्टिममुळे विहाराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, घुमट, प्रवेशद्वार, दर्शनी भाग प्रकाशीत होणार आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय मानकानुसार सुरक्षा व गुणवत्ता राखून करण्यात येणार आहे.
या प्रोजेक्टला ‘Lighting the Mahabodhi’ असे नाव दिले गेले असून भूतान देशातील खिन्ट्से फाउंडेशन हा प्रकल्प राबवित आहे. यासाठी सर्व थरातून परवानगी देण्यात आली असून पर्यावरणास व मुख्य विहारास कोणतीही हानी पोहोचणार नाही व जगभरातून दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना या प्रकाशयोजनेचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. कालबाह्य झालेली, वारंवार बंद पडणारी जुनी लाईटिंग तसेच प्रकाशझोत दिवे काढण्यात येणार असून त्याजागी वापरण्यास सोपी व आधुनिक तंत्रज्ञान असलेली लाईटिंग वापरण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बँकॉक येथील लाईटिंग डिझाइन कंपनी ‘B -Lit’ विहारासाठी विनामूल्य संकल्पन करीत आहे. जागतिक वारसा यादीत हे स्थळ असूनही याचा नकाशा उपलब्ध नाही. यामुळे या स्थळाचा संपूर्ण सर्व्हे करून नकाशा काढण्यात आला आहे.यासर्व कामासाठी एकूण २.४ मिलियन यू एस डॉलर इतका खर्च येणार आहे.
झोन्गसर रेनपोचे यांनी सांगितले की महाबोधी विहाराच्या आजूबाजूला असणारी महत्त्वाची स्थळेही भविष्यात निसर्गाशी समतोल साधत उजळण्यात येणार आहेत. कारण सिद्धार्थ गौतमांना इथेच ज्ञानप्राप्ती होऊन ते बुद्ध झाले. असे हे पवित्र स्थळ दीपोत्सवासारखे प्रकाशमान असले पाहिजे. या आधुनिक लाईटिंग सिस्टीम मुळे ते कायम उजळलेले राहील. अशा कामासाठी दिलेले दान अधिक फलदायी ठरेल.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
Very nice article great information thanks thanks thanks Jai Bhim Jai Mulnivasi Bahujan Jaago Jaago Jaago India 2019