इतिहास

भगवान बुद्धांचा आठवा वर्षावास – भेसकला मृगदाव वन, संसुमारगिरी भाग १०

भग्ग देशाचा राजकुमार बोधि (जो उदयन राजाचा पुत्र होता) याच्या अमंत्रावरून भ. बुद्ध संसुमारगिरी नगरात वर्षावासासाठी गेले. येथील भेसकला मृगदाव वनात त्यांचे वास्तव्य होते. हेच आत्ताचे उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्य पर्वतराजी मधील चुनार पर्वत होय.

‘धोनसाख जातक’ मध्ये तसेच विनय पिटकातील ‘चुल्लवग्ग’ आणि ‘अंगुत्तर निकाय’ मध्ये बोधि राजकुमाराने भ.बुद्धांचे स्वागत त्याच्या कोकणद राजमहालात केल्याचा उल्लेख आहे. ‘थेरगाथा’ नुसार जेष्ठ स्थविर सिरीमण्ड यांचे जन्मगाव देखील संसुमारगिरी नगरी होय व येथेच त्यांची प्रव्रज्या झाली होती. भ.बुद्धांचे अग्र शिष्य महामोग्गल्लान याच पर्वतावर ‘अर्हत’ झाले होते.

या वर्षावासात नकुल माता पिता त्यांना भेटायला आले होते व बुद्धांबरोबर चर्चा केली. वर्षावासाच्या काळात अनेक वेळा बुद्धांना त्यांच्या घरी भोजनाचे आमंत्रण असे. धम्माप्रती त्यांची श्रद्धा आणि आचरण बघून बुद्धांनी त्यांना अग्र गहपति आणि अग्र गहपत्नी म्हणून संबोधले होते. एक आदर्श दम्पती म्हणून त्यांचे अनुमोदन केले होते. वर्षावास संपल्यानंतर बुद्ध कौशाम्बी नगरात जाण्यासाठी निघाले.

अतुल भोसेकर

संदर्भ:
विनय पिटक
बुद्धचर्या
अंगुत्तर निकाय
थेरगाथा
Geography of Early Buddhism
संयुत्त निकाय

One Reply to “भगवान बुद्धांचा आठवा वर्षावास – भेसकला मृगदाव वन, संसुमारगिरी भाग १०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *