इतिहास

भगवान बुद्धांचा चवथा वर्षावास – वेळूवन कलन्दक निवाप, भाग 7

भ. बुद्धांचा चवथा वर्षावास राजगृह येथील कलन्दक निवाप या वनात व्यतीत केला. हे वन वेळूवनाचा भाग असल्यामुळे याचे पालि साहित्यात नेहमीच वेळूवन कलन्दक निवाप असा उल्लेख केला आहे. उदा. महापारिनिब्बाण सुत्त मध्ये “रमणियो वेलुवने कलन्दकनिवापो”. याच वनात बुद्धांनी सिग्गलोवाद सुत्ताचा उपदेश दिला होता.

या वर्षावासाच्या काळात, राजगृहाला एक श्रेष्ठी पुत्र उग्गसेन हा एक डोंबारीनीच्या प्रेमात पडला. तो तिच्या इतक्या प्रेमात पडला होता की तिच्याबरोबर तो दोरीवरचे खेळ करू लागला. कालांतराने त्याचा प्रेमभंग झाला व तो सैरभैर असतानाच त्याच्या कानी बुद्धांचा उपदेश पडला व तो भिक्खू होण्याच्या विचार करू लागला. याच वर्षावासात बुद्धांनी त्याला भिक्खू संघाची दीक्षा दिली.

या वनात बुद्धांनी अनेक उपदेश दिले आहेत जे सुत्त निपात, मजझीम निकाय, संयुत्त निकाय आणि अंगुत्तर निकायात पाहायला मिळतात. या वर्षावासानंतर भ. बुद्ध वैशाली येथील महावन कुटागारशाला येथे राहायला गेले.

अतुल भोसेकर

संदर्भ:
बुद्धचर्या
धम्मापदठ्ठकथा
Ancient Geography of India
On Huen Tsang’s Travels in India
समंतपासादिक
पपंचसुदनी
विनायपिटक

One Reply to “भगवान बुद्धांचा चवथा वर्षावास – वेळूवन कलन्दक निवाप, भाग 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *