इतिहास

भगवान बुद्ध यांचे नागछत्रधारी शिल्प

ज्ञानप्राप्ती नंतर भगवान बुद्ध सात आठवडे ध्यानमग्न अवस्थेत राहिले होतेे. त्यावेळी पाचव्या आठवड्यात तळ्याकाठी ध्यान करीत असताना अचानक वादळी पाऊस सुरू झाला. तेव्हा तळ्यातून नागराजा मुचुलिंद बाहेर आला व त्याने भगवान बुद्धांचे आसन आपल्या अजस्त्र वेटोळ्यांनी उचलून त्यांच्या वरती संरक्षणार्थ फणा पसरला. ही कथा पाली साहित्यात असून पूर्वेकडील देशांत लोकप्रिय आहे. भारतातही बोधगया येथे अनेकांनी नागराजा मुचुलिंद आणि भगवान बुद्ध यांचे सर्पछत्रधारी शिल्प पाहिले असेल.

अशा या फणा पसरलेल्या नागाचे शिल्प दोन हजार वर्षांपासून भारतात कोरले जात असून अजूनही ठिकठिकाणी ते उत्खननात आढळून येते. कल्चरल सेंटर अमरावती-विजयवाड्याचे बुद्धिस्ट स्कॉलर डॉ. ई शिवनागी रेड्डी आणि अमरावती बुद्ध विहाराचे सचिव सुभाकर मेदासनी यांना २१ डिसेंबर २०१८ रोजी आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील अगस्तीश्वरा देवळातील उत्खननात नाग मुचुलिंद याचे शिल्प आढळले. अशा तऱ्हेची अनेक शिल्पे चंदवरम, घंटाशाला, नागार्जुनकोंडा, पेडाकल्लेपल्ली व गोली या ठिकाणी आढळली आहेत व ती सर्व बुद्ध शिल्पांशी निगडित आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *