बातम्या

थायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू

थायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून त्याचे भोजनदान केले जाते.

भगवान बुद्धांच्या काळात त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर दहा महिन्यांनी माघ पौर्णिमे दिवशी १२५० उपासकांना उपसंपदा मिळून एक मोठा भिक्खू संघ तयार झाला होता. तो दिवस माघ पौर्णिमेचा संघ दिवस म्हणून थायलंड आणि म्यानमार मध्ये साजरा केला जातो.

माघ पौर्णिमेनंतर व्हॅलेंटाईन डे सुद्धा येत असल्याने तेथील सरकारने थोडेसे सबुरीने वागण्यास सुचविले आहे. चीनमध्ये आलेल्या कोरोना रोगाच्या साथीमूळे काळजी घेणे बाबत तसेच बँकॉक शहराची प्रदूषणाची पातळी जास्त असल्यामुळे सरकारने धूर सोडणाऱ्या अगरबत्त्या लावण्यावर काही प्रमाणात बंदी घातलेली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रदूषण रोखणे बाबत पुढाकार घेतला आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)