इतिहास

महाराष्ट्र म्हणजेच महारठ् ठ” देश…?

सिलोन (श्रोलंका) मध्ये लिहिलेल्या पालि भाषेतील दीपवंस आणि महावंस या बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात “महारठ् ठ” देशाचा उल्लेख आहे. पालि भाषेतील “महारठ् ठ” याचे संस्कृतात ‘महाराष्ट्र’ असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे.

महावंस हा गृंथ इ. स. नंतर पाचव्या शतकात लिहीला गेला. दीपवंस त्याच्या बर्‍याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की, स्थविर मोग्गलीसुत्त तिस्स याने (तिसऱ्या) संगीताचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देशसमूहाला धम्मस्थापणेसाठी कार्तिक महिन्यात स्थविरांना पाठविले. कोणकोणत्या धर्मोपदेशकांना कोठेकोठे पाठविले त्याची सविस्तर माहिती महावंसामध्ये आढळते. त्यात “महारठ् ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला “महारठ् ठ” नावाच्या देशाला पाठविले, ‘असा उल्लेख आहे.

अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशाचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. अहिहोळचा लेख शके ५५६ म्हणजे इ. स. ६३४ चा आहे. ह्यू-एन-त्संगने आपल्या प्रवास वर्णनात ज्या ‘मो-हो-लो-च्छि’ या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजेच महाराष्ट्र असे विद्वानांचे मत आहे. ह्यू-एन-त्संग महाराष्ट्रात इ. स.६४१-४२ मध्ये आला होता. असा उल्लेख आहे.

3 Replies to “महाराष्ट्र म्हणजेच महारठ् ठ” देश…?

    1. महारठठ बाबत अजून विस्तृत माहिती मिळेल का

  1. महारठठ – खूप उपयोगी माहिती,अजून काही संदर्भ असतील तर प्रसिद्ध करा.

Comments are closed.