जगभरातील बुद्ध धम्म

येथे डोंगरामध्ये ६३ मीटर उंच बुद्ध शिल्प मिळाले; मूर्तीसाठी ४०० किलो वजनाचे चीवर

चीनच्या शांझी प्रांतात मेंग नावाची पर्वतराजी आहे. तिथे दगडांच्या व कोळशाच्या खाणीं आहेत. सन २००५ मध्ये एका स्थानिक शेतकऱ्यास तेथील डोंगरांमधील एक भाग बुद्धप्रतिमा सारखा वाटला. ते त्याने स्थानिक कार्यालयास कळवीले. तेव्हा तेथील झाडे, दगड, माती साफ करण्यात आली. तर तेथे एक चक्क अवाढव्य ध्यानस्थ बुद्ध शिल्प मिळाले. त्याची अवस्था मात्र खूप खराब होती. शिल्पा मधील दगड हजारो वर्षांपासून झीज होउन ठिसूळ होऊन गेले होते. काही निखळले होते. अनेक चिरा पडल्या होत्या.

यास्तव ६३ मीटर उंच असलेल्या या शिल्पाच्या दुरुस्तीसाठी चीन मधील भूमी अभिलेख खात्याने १०.८ मिलियन युवान निधी दिला. पण या निधीमध्ये फक्त बुद्ध शिल्पाचा चेहरा दुरुस्त होऊ शकला. खालील दगडी भाग तसाच राहिला. यास्तव या शिल्पावर पूर्णपणे चीवर पांघरण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार स्थानिकांनी मूर्तीसाठी चिवर तयार केले. त्याचे वजन ४०० किलो झाले. मग समारंभपूर्वक ते दहाजणांतर्फे मूर्तीला परिधान करण्यात आले. जेणेकरून ऊन, पाऊस, वारा यापासून बुद्धशिल्प सुरक्षित राहील. दगडांची झीज कमी होईल.

मेंगशान बुद्धशिल्प

१५०० वर्षापूर्वीचे हे मेंगशान बुद्धशिल्प हळूहळू लोकांसाठी आकर्षण ठरत असून चीवर परिधान केलेली ही बुद्धमूर्ती बघण्यास पर्यटक येत आहेत. तसेच या मूर्तीच्या सुरक्षितेसाठी तेथील पर्वतराजी मधील सात खाणी बंद करण्यात आल्या आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

2 Replies to “येथे डोंगरामध्ये ६३ मीटर उंच बुद्ध शिल्प मिळाले; मूर्तीसाठी ४०० किलो वजनाचे चीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *