बातम्या

मराठवाड्यातील ”ही” महानगरपालिका राज्यातील सर्वात उंच बुद्धमूर्ती उभारणार

नांदेड महानगरपालिकेने नुकतेच १०० फूट उंच बुद्धमूर्ती उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. बुद्धमूर्ती बसविण्याचा ठराव महानगरपालिकेने पारित केल्यानंतर विविध विभागांचे आवश्यक असलेल्या 8 पैकी चार विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. उर्वरित चार विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त प्राप्त करण्यासाठी मनपा पाठपुरावा करत आहे. ही बुद्धमूर्ती महापालिकेच्या 2 एकर जागेत उभारण्यात येणार आहे.

नांदेड शहर हे देश आणि जगभरात विखुरलेल्या शिख बांधवांसाठी श्रद्धास्थान आहे. नांदेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंघ यांची समाधी आहे. शहरातील मुख्य गुरुव्दारासह अन्य ठिकाणी गुरुव्दारा आहेत.

नांदेड रेल्वे स्टेशन समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा

नांदेड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा अतिशय सुंदर डिझाईन करून उभारण्यात आला आहे. त्यासोबत मुखेड येथे यापूर्वी ५० फूट बुद्धमूर्ती उभारण्यात आली आहे. किनवट येथे सुद्धा तथागत बुद्धांची भव्य मूर्ती आहे. नांदेड शहरात १०० फूट बुद्धमूर्ती उभारण्यात येत असल्याने येथील सर्व बौद्ध बांधवानी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *