बातम्या

राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर

महाड इथे पुरामुळे अतिशय हानी झाली आहे. तिथल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदत करण्यासाठी राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबईचे ५० स्वयंसेवक, डॉ हर्षदीप कांबळे, उद्योग आयुक्त ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड इथे दाखल झाले आहेत.

महाडच्या ऐतिहासिक क्रांतिसंगराची पार्श्वभूमि असलेल्या बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या महाड़ शहराला आलेल्या पुराच्या संकटात चिखलमय झालेला महाड शहराला तसेच आजूबाजूच्या ७ ते ८ गावांना पुन्हा उभे राहण्यास समितिचे ५० स्वंयसेवक चार ते पाच दिवसासाठी मदत करणार आहेत. सोबत 5 टन अन्न धान्य, ( तांदूळ, डाळी, ४०००० पॉकेट्स बिस्किटे, बिस्लरी पाणी,) स्त्रियांसाठी 1500 साड्या व मैक्सी, झोपण्यासाठी १००० चटई, १००० टी शर्ट यांचे वाटप करण्यात येईल. तसेच त्या ठिकाणची स्वयंसेवक साफ सफाई तथा गाळ काढण्याचे काम सुद्धा करणार आहेत.

महाड शहरामध्ये भारत देशातील मानव अधिकाराचा सर्वात मोठा सत्याग्रह झाला होता, जो दांडी मार्चच्या आधीचा आहे. काही कर्मठ लोकांनी खूप विरोध केला होता तरी चवदार तळे डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संघर्षानंतर ते सर्वांसाठी खुले झाले होते. नाना टिपणीस सारख्या लोकांनी तेंव्हा बाबासाहेबांना खूप मदत केली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप या सर्व कार्यात आहे.

डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या सहकार्याने 31 ऍम्बुलन्स
डॉ. हर्षदीप कांबळे (IAS) उद्योग आयुक्त, उद्योग ह्यांनी करोना काळामध्ये ही खूप लोकांना मदत केली. नुकतेच 31 ऍम्बुलन्सचे वाटप त्यांनी त्यांच्या पत्नी उपासिका रोजाना कांबळे ह्यांच्या मदतीने भारतातील लडाख, बोधगया, सारनाथ पासून तर औरंगाबाद, नागपूर सह बंगलोर पर्यंत केले आहे . हे ऍम्बुलन्स सर्व लोकांच्या उपयोगी पडणार आहेत.

थायलंडचे कॉन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थित पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

कांजूर मार्ग येथे फ्री ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुविधा केंद्र
मुंबईला नुकतेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी डॉ हर्षदीप कांबळे ह्यांच्या वतीने एक फ्री ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुविधा केंद्र, कांजूर मार्ग इथे उघडण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त मुंबईतील प्रमुख भन्तेजींना सुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप त्यांच्या मार्फत करण्यात आले असून, मॅडम रोजाना व्हॅनीच ह्यांनी 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत महाराष्ट्राला केली आहे. महाडच्या खूप गरजेच्या मदती मध्येही त्यांचीही दान पारमिता आणि लोकांविषयीच्या तळमळीचा प्रत्यय पुन्हा दिसून येत आहे . ह्या करुणामयी बुद्धिस्ट दांपत्याचे खूप खूप आभार.

डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्फत मुंबईतील प्रमुख भन्तेजींना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले.

महाड मध्ये आलेला पूर आणि ह्या अतिशय गरजेच्या मदत कार्यानिमित्ताने आपले ५० तरुण मुलं आणि मुली कठीण परिस्थिती राहून कुशल कम्म करणार आहेत. बुद्धिस्ट तरुणांनी एकत्रित येऊन सर्वांसाठी काम करणे हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून डॉ. हर्षदीप कांबळे सर आणि राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या ५० स्वंयंसेवकांना धम्मचक्र टीमचा सलाम! जयभीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *