बातम्या

GBC INDIAच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : जागतिक धम्म परिषद (GLOBAL BUDDHIST CONGREGATION) आणि आवाज इंडिया चॅनेलच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित शुक्रवार 23, शनिवार 24 रविवार २५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक संवाद कार्यक्रमात जगभरातून विविध देशातून मान्यवर सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी सहा वाजता राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे लेह/लद्दाख येथील महाबोधि मेडीटेशन सेंटरचे अध्यक्ष भदंत संघसेना आणि राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी सात वाजता सम्यक संवाद या कर्यक्रमात ‘‘धम्मचक्र प्रवर्तन झाल्यापासून आपली प्रगती कशी झाली, Generation Next च्या प्रगतीची रणनीती कशी असावी? या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी भदंत चंदिमा (सारनाथ), डॉ. हर्षदीप कांबळे (IAS), अमनदीप कौर (जर्मनी), अनिल वागदे (अमेरिका), सोहनलाल गिंडा (स्काट्लंड) आदी सहभागी होणार आहेत.

२३ ऑक्टोबर आणि २४ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी (ता.२५) धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी सकाळी सात वाजता बुद्धवंदना, जयमंगल अष्टगाथा, मैत्री गीत, रतनसुत्त होणार आहे. त्यानंतर आठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतरावर भाषण, नऊ वाजता सन्मानीय भिक्खू संघाकडून विशेष धम्मदेसना होणार आहे.

सकाळी ११ वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष डॉक्युमेंटरी, दुपारी १२ वाजता सम्यक संवाद कार्यक्रमात ”डॉ आंबेडकरांनी बुद्ध धम्म का स्वीकारला?” या विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाश्रमणा राजश्री बुद्धमित्रा (चेन्नई) मा.राजशेखर वुंड्रु (IAS), ओमप्रकाश मौर्य (मुंबई) डॉ. कृष्णा कांबळे (नागपुर) सहभागी होणार आहेत.

दुपारी २:३० वाजता : सम्यक संवाद
प्रबुद्ध भारत के निर्माण में भिक्खु संघ तथा उपासकों का समन्वय

सहभाग : भदंत बोधिपालो (औरंगाबाद), भदंत नागबोधि (ओड़िशा), पुष्पा बौद्ध (बालाघाट)
रमेश बेनकर (अहमदाबाद)

दुपारी चार वाजता : बौद्ध जीवनपद्धतीने काय फायदा होतो?

सहभाग : डॉ. हर्षदीप कांबळे (IAS), आनंद कृष्णा (IRS), निखिल मेश्राम (IRS), क्रांति खोब्रागडे (IRS)

सायंकाळी 6.30 वाजता : बुद्धवंदना,रतनसुत्त (दीक्षाभूमी)

सायंकाळी 7.00 वाजता: धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोप

सहभाग :
राजेंद्रपाल गौतम (मंत्री, दिल्ली सरकार)
डॉ.नितिन राऊत (ऊर्जामंत्री, महाराष्ट्र)
मा.सुबचन राम (कमिश्नर, Income Tax)

रात्री ८:३० वाजता : अनुप जलोटा आणि कलाकारांकडून संगीतमय अभिवादन कार्यक्रम

रात्री ९:३० वाजता : अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया येथील धम्मचक्र प्रवर्तन समारोप कार्यक्रम

संपूर्ण थेट प्रेक्षपण : https://gbcindia2020.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *