बातम्या

तलावातील गाळ काढताना प्राचीन शिल्प, शिलालेख आणि मूर्ती सापडली; बुद्ध मूर्ती असल्याचा दावा

बुद्ध मूर्ती सापडल्याचा स्थानिकांचा दावा
मानकेश्वर या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंचे संशोधन केल्यानंतर इतिहासाची पाने उघडली जाणार आहे. पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती नेमकी कशाची आहे याची माहिती मिळणार आहे.

पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती नेमकी कशाची आहे याची माहिती मिळणार आहे.

शिल्प, शिलालेख आणि मूर्ती सापडली
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील पाझर तलावामध्ये वन विभागाच्या वतीने गाळ काढण्याचे काम करण्यात येत होते. यावेळी वन विभागाला प्राचीन शिल्प, शिलालेख आणि एक मूर्ती सापडली आहे. सापडलेली मूर्ती ही बुद्ध मूर्ती असावी असा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

पुरातत्व विभाग पाहणी करणार
मूर्ती आणि अवशेष हे कोणत्या शतकातील आहेत याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. त्याचबरोबर वेगवेगळे शिलालेख ही आढळून आले आहेत. पुरातत्त्व विभागाने या मूर्तीची पाहणी केल्यानंतरच ही मूर्ती कुणाची आहे,याची माहिती मिळणार आहे. याबाबत संशोधन झाल्यानंतर इतिहासातील आणखी पान उघड होणार आहे.

प्रशासन आणि पोलीस विभागाची भेट
पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती नेमकी कशाची आहे याची माहिती मिळणार आहे.सापडलेल्या वस्तूंमध्ये दगडावर कोरलेल्या काही मुती आहेत तर मंडपाचे शिलालेख आहेत. मुर्ती सापडलेल्या ठिकाणी पोलीस व महसूल प्रशासनाने भेट दिली असून गावकर्‍यांनी पुरातत्व विभागास माहिती दिली असल्याचे समजते.