बुद्ध तत्वज्ञान

अपमान करणाऱ्या लोकांना तथागतांनी दिलेले उत्तर…

एकदा असं झाले.. एका गावात तथागत बुद्धाचा काही लोकांनी अपमान केला. त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. बुद्धाने सर्वकाही शांतपणे ऐकले, तदनंतर त्यांना म्हणाले ‘तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का? कारण मी घाईत आहे. दुसऱ्या गावाला मला पोहचायचे आहे. तीथं लोक माझी वाट पाहत असतील. त्यांना मी वेळ दिली आहे. तुम्हाला अजुन काही सांगायचे असेल तर मी परत याच मार्गाने येईन. तुम्हांला जे काही सांगायचे असेल ते तेंव्हा सांगा.’

ते सर्व आश्चर्यचकित झाले नि म्हणाले, ‘आम्ही काही सांगत नाही, तर तुम्हांला शिव्या देत आहोत.’
तथागत बुद्ध हसले व म्हणाले, ‘जर असे असले तर तुम्ही थोडे उशीरा आलात. कमीत कमी दहा वर्षापूर्वी यायला हवे होते. मी आता मुर्ख माणूस राहीलो नाही. तुम्ही मला अपमानित केलेत. ते तुमचे स्वातंत्र्य आहे. परंतु तो अपमान स्वीकारावा की न स्वीकारावा हे माझे स्वतंत्र आहे.’

पुन्हा बुद्ध म्हणाले, ‘मागच्या गावात लोकांनी मिठाई आणली होती मला भेट म्हणून. मी त्यांचे आभार मानले. मी मिठाई खात नाही म्हणून मी त्यांना ती मिठाई साभार परत केली. त्या मिठाईचे काय झाले असेल सांगाल तुम्ही?’ त्या जमावातील एक म्हणाला, ‘आता, तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला अपमान परत घ्यावा लागेल कारण त्याचा मी स्वीकारच केला नाही. दुसरा मार्गच उरला नाही.’