श्रीलंका म्हंटल कि, सर्वांच्या डोळ्यासमोर येत ते, चारही बाजूंनी समुद्रान वेढलेलं एक छोटसं बेट. जगाच्या नकाशात भारताच्या दक्षिणेपासून थोडं दूरवर दिसणार हे बेट सर्वांच लक्ष वेधून घेत. भारताचा ‘अश्रू’ म्हणून प्रसिद्ध आख्यायिका असणारा, हा देश पाहण्याचं आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असत. आशिया खंडातील इतर आश्चर्यांपैकी एक आश्चर्य, चारही बाजूंनी अभूतपूर्व निसर्गसौंदर्याने नटलेला देश दक्षिण आशियातील एक द्विपप्रजासत्ताक देशाला लाभलेल्या निसर्गसौंदर्याने वेढल्यामुळे ‘पाचूचे बेट’ म्हणून ओळखले जाते.
मौल्यवान खडे, चहा व मसाल्याच्या पदार्थांसाठी प्राचीन काळापासून बेट प्रसिद्ध आहे. श्रीलंकेत प्रथम बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मौर्य सम्राट अशोक याने पाठवलेल्या आपला मुलगा महेंद्र आणि शिष्टमंडळातील लोकांकडून सिंहली राजा ‘तिसा’ याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर आलेल्या अनेक बौद्धधर्मीय संस्था एकत्रित येऊन बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील प्रमुख धर्म झाला आहे. तथागताच्या धम्माच्या पाऊलखुणा या भूमीवर जश्या पडल्या त्याचा वारसा श्रीलंकेत आजही पाहायला मिळतो.
हाच धम्माचा जपलेला वारसा पाहण्याची संधी आपल्याला ‘p- square’ देत आहे. ‘७ दिवस आणि ६ रात्री’ मध्ये श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य पाहण्याची मनसोक्त आनंद लुटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
सविस्तर माहिती खालील प्रमाणे :
दिवस १ :
मुंबई ते कोलंबो विमान प्रवास. सकाळी ११ वाजता कोलंबो विमानतळ वर आगमन. विमानतळ वरून हॉटेल चेक इन. त्याच संध्याकाळी “केलानिया राजा महाविहार ” भेट.
केलानिया राजा महाविहार , हे बुद्धाने श्रीलंकेला दिलेल्या शेवटच्या भेटीनंतर बांधले आहे. संध्याकाळी पुष्प आणी जल वंदना. रात्री हॉटेल मुक्काम.
दिवस २ :
कोलंबो – अनुराधापुरा (२०० किमी / ४ तास )
सकाळी नाश्ता करून अनुराधापुरा , श्रीलंकेची जुनी राजधानी साठी प्रवास.
धम्माच्या दृष्टिकोनातून हे शहर अतिशय महत्वाचे आहे..
रुवानवेलीसाया : राजा दुतुगामानू यांनी बांधलेल्या महास्तूपास भेट,
जेथवनारामय स्तूप : जगातील सर्वात उंच स्तूप.
जया श्री महाबोधी : भिक्कूनी संघमित्रा यांनी लावलेलं बोधी वृक्ष.
अभियागिरी विहार : जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं विट बांधकाम असलेल विहार.
इसुरुमुनिया मंदिर : राजा देवानामप्या यांनी बांधले आहे. येथे ५०० बालकांची परिव्रजा झाली होती.
थुपरामाय : श्रीलंकेतील पहिले बुद्ध विहार.
दुसऱ्या दिवसाची रात्र अनुराधापुरा येथे थांबा.
दिवस ३ :
अनुराधापुरा – मिहिनतले – औकाना – दंबूला (२०० किमी / ४ तास )
श्रीलंके मधील बौद्ध धम्माचे जन्म स्थळ. भिक्कू महिंदा आणी राजा देवमिन्यापयतिस्स याच्या भेटीचे ठिकाण. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार याच ठिकाणावरून सुरु झाला.
दुपारी मिहिनताले वरून औकाना साठी प्रवास :
औकाना बुद्ध : श्रीलंकेतील उभ्या मुद्रांची एक बुद्ध मूर्ती जे गांधार आणी अमरावती शैली दर्शवते.
दंबूला येथे रात्रीचा थांबा.
दिवस ४ :
दंबूला – सिगारिया – पोलोन्नरुवा – दंबूला
दंबूला वरून सिगारिया साठी प्रस्थान , सिगारिया UNESCO साईट . २०० मीटर उंचीवर राजा कश्यप यांनी बसवलेले शहर जे कि बुद्धिस्ट मॉनेस्ट्री सुद्धा आहे .
सिगारिया वरून पोलोन्नारुवा साठी प्रवास
पोलोन्नारुवा एक जुने शहर जिथे तुंम्ही पॅलेस , जुने खोद काम आणी प्राचीन बुद्धांचे अवशेष बघू शकता. अनुराधापुरा नंतर हे दुसरे प्राचीन शहर
गल विहार : बुद्धांच्या शयन आणी उभ्या मुद्रेत शिपलं इथे आहेत. ध्यान साधनेचे एक सेशन घेऊन दंबूलासाठी परतीचा प्रवास.
दिवस ५ :
दंबूला वरून कँडी साठी प्रवास .
बुद्धांचे दाताचे मंदिर असे संबोधले जाते. बुद्धाचे अस्थी दर्शन.
सोबतच आंतराष्ट्रीय बुद्धिस्ट म्युझीअम इथे भेट . Elephant Orphanage जिथे तुम्ही हत्ती बघू शकता आणी हाथ लावून एक अविस्मरणीय क्षण उद्भवू शकता . सोबतच कँडी शहराची टुर . लांकांतलीका बुद्ध विहार , रोल पॅलेस , कँडी विव पॉईंट आणी बरेच काही या दिवशी असणार .
या रात्री कॅन्डी मध्ये थांबा
दिवस ६ :
कँडी वरून निवारा एलीया साठी प्रवास.
निवारा एलीया एक निसर्ग रम्य हिल स्टेशन . रस्त्यानी टी प्लॅनॅशन , टी फॅक्टरी ची भेट , आणी रात्री नेबोम्बो साठी प्रवास .
रात्र नेबोम्बो इथे थांबा
दिवस ७ :
सकाळचा नाश्ता करून कोलंबो सिटी टुर आणी मुंबई साठी परतीचा प्रवास
अधिक माहितीसाठी : PRAGAT PADGHAN
P SQUARE TRIPS PVT LTD
pragat@p2trips.com
+91 9762970440 | +91 9145050409