जगभरातील बुद्ध धम्म

अफगाणिस्तानात पुन्हा बुद्ध हसणार; कुशाण काळातील बौद्ध स्तूपाची दुरुस्ती सुरु

अफगाणिस्तान देशातील पारवान प्रांतातील चारीकर जवळ असलेला टोपदारा स्तूप हा इसवीसन चौथ्या शतकाच्या आसपास बांधलेला असल्याचा अंदाज आहे. 2016 पासून अफगाण कल्चरल हेरिटेज कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन (एसीएचसीओ) मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन स्तूप साइट दुरुस्ती आणि संवर्धन करीत आहे.

टोपदारा स्तूप हा कुशाण शासक कनिष्क यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे. या स्तूपाची मुख्य रचना ही दगडी असून त्याचा व्यास २३ मीटर आहे तर उंची सुमारे ३० मीटर उंच आहे. टोपदारा स्तूप मूळत: पांढर्‍या प्लास्टरने झाकलेला असावा. या स्तूपात पूर्वेकडच्या बाजूला भगवान बुद्धाची सुशोभित मूर्ती होती.

चार्ल्स मॅसन यांनी 1830 च्या दशकात या जागेची ओळख करुन दिली होती. त्यानंतर जपानच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने विल्सनच्या 1841 च्या प्रकाशनातील ‘एरियाना क्वान्टिक’ मध्ये प्रकाशित केले परंतु 1965 पर्यंत सर्वेक्षण केले गेले नाही.

अमेरिकेच्या दूतावासाच्या मदतीने अकोको आणि अफगाणिस्तानच्या पुरातत्व संस्था मिळून अफगाणिस्तानातील हे महत्त्वाचे हेरिटेज साइट पुनर्संचयित करण्यासाठी आणि आशियातील बौद्ध साइटचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुरातत्व विभागाने या परिसरात उत्खनन सुरू ठेवेल आहे.

One Reply to “अफगाणिस्तानात पुन्हा बुद्ध हसणार; कुशाण काळातील बौद्ध स्तूपाची दुरुस्ती सुरु

Comments are closed.