ब्लॉग

जपानी भिक्खू यांनी जुन्नर लेणी (लेण्याद्री) येथे केली बुद्ध वंदना

जपानी बौद्ध भिक्खू ‘टी मोरिता’ आणि जपान मधील भारतीय बौद्ध लेण्यांचे अभ्यासक ‘आंदोजी’ यांच्या बुद्ध वंदनेने आज जुन्नर लेणी (लेण्याद्री) दुमदुमली. आज जुन्नर येथील लेण्यांमध्ये त्यांचे आगमन झाले. वय ७२ वर्षे असलेले हे जपानी बौद्ध भिक्खू किंचितही न थांबता सर्व पायऱ्या चढून मुख्य चैत्यगृहात गेले. तेथे त्यांनी जपानी भाषेतून बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर पाली भाषेतील बुद्ध वंदना आम्ही सर्वांनी म्हटली.

आज रविवार असल्याने गणेश दर्शनासाठी भरपूर गर्दी होती. बौद्ध भिक्खू त्यांचे वाद्य वाजवत वरती चढताना पाहून अनेकजण चकित झाले. जे सुजाण होते ते समजून गेले. जे अजाण होते ते नुसते बघतच राहिले. चैत्यगृहात वंदना म्हणताना सुद्धा अनेकजण हजेरी लावून गेले.

*जपानी भिक्खू यांनी जुन्नर लेणी ( लेण्याद्री) येथे केली बुद्ध वंदना* Preyar of Japanese Monk in Junnar Caves (Lenyadri- India)जपानी बौद्ध भिक्खू 'टी मोरिता' आणि जपान मधील भारतीय बौद्ध लेण्यांचे अभ्यासक 'आंदोजी' यांच्या बुद्ध वंदनेने आज जुन्नर लेणी (लेण्याद्री) दुमदुमली. आज जुन्नर येथील लेण्यांमध्ये त्यांचे आगमन झाले. वय ७२ वर्षे असलेले हे जपानी बौद्ध भिक्खू किंचितही न थांबता सर्व पायऱ्या चढून मुख्य चैत्यगृहात गेले. तेथे त्यांनी जपानी भाषेतून बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर पाली भाषेतील बुद्ध वंदना आम्ही सर्वांनी म्हटली. आज रविवार असल्याने गणेश दर्शनासाठी भरपूर गर्दी होती. बौद्ध भिक्खू त्यांचे वाद्य वाजवत वरती चढताना पाहून अनेकजण चकित झाले. जे सुजाण होते ते समजून गेले. जे अजाण होते ते नुसते बघतच राहिले. चैत्यगृहात वंदना म्हणताना सुद्धा अनेकजण हजेरी लावून गेले. बारा वर्षांपूर्वी खणखणीत आवाजात आम्ही कुटुंबासोबत इथेच बुद्ध वंदना म्हटली होती. सांगायचे एवढेच की लेण्या आपल्याच आहेत. तेथे जाणे येणे ठेवले तरच हा वारसा टिकणार आहे. जपानचे भन्तेजी इथे येऊन हजेरी लावतात, तर आपण मागे का ? कोणी काहीही म्हणो, आपण आपला शांतीचा मार्ग अनुसरावा.— संजय सावंत ( नवी मुंबई )⚛⚛⚛

Posted by Sanjay Sawant on Sunday, January 12, 2020

बारा वर्षांपूर्वी खणखणीत आवाजात आम्ही कुटुंबासोबत इथेच बुद्ध वंदना म्हटली होती. सांगायचे एवढेच की लेण्या आपल्याच आहेत. तेथे जाणे येणे ठेवले तरच हा वारसा टिकणार आहे. जपानचे भन्तेजी इथे येऊन हजेरी लावतात, तर आपण मागे का ? कोणी काहीही म्हणो, आपण आपला शांतीचा मार्ग अनुसरावा.

जुन्नरच्या अंबा-अंबिका लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू आणि जपानचे लेणी अभ्यासक

रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी जुन्नर लेण्या ( लेण्याद्री ) पाहून झाल्यावर बौद्ध भिक्खू ‘टी मोरिता’ आणि लेण्यांचे जपानी अभ्यासक ‘आंदोजी’ यांचे बरोबर आम्ही अंबा-अंबिका लेण्यांमध्ये गेलो. आमच्यासोबत लेणी अभ्यासक सुरज जगताप यांनी ओळख करून दिलेले जुन्नर निवासी अमोल गायकवाड, सिद्धार्थ कसबे आणि त्यांचे मित्र होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गाडी त्या लेण्यांच्या पायथ्याशी नेणे सुलभ झाले.

तिथून मग थोडेसे वरती चालत गेल्यावर लेण्यांचा भव्य नजारा दृष्टीस पडला. शांत व सुखद वातावरण आणि त्यात भांतिजींच्या वाद्याचा स्वर आणि त्यांचा ‘नाम्यो हो रेंगे क्यो’ या निचिरेन पंथाचा नामोच्चार मंत्रमुग्ध करीत होता. येथील भव्यदिव्य लेण्या आणि स्तुप पाहून जुन्नर एकेकाळी बौद्ध नगरी असावी याची खात्री पटते. बौद्ध पर्यटकांनी सकाळी जुन्नर(लेण्याद्री) पाहून झाल्यावर दुपारी या अंबा-अंबिका लेण्या जरूर पहाव्यात. तिसऱ्या शतकात खोदलेल्या मानमोडी डोंगरातील या सर्व लेण्या जुन्नरचा वैभवशाली इतिहास प्रगट करतात. जुन्नरच्या शिलालेखातून अनेक व्यापारी संघांचा उल्लेख येतो. त्याकाळातील धम्म हा केवळ डोंगरकपारी लेण्यात राहणाऱ्या भिक्खूंपुरता मर्यादित नसून सर्वत्र मोठ्याप्रमाणात फोफावला होता.

बौद्ध लेण्यांचे जपानी अभ्यासक आंदोजी ( वय वर्षे ६५ ) यांना देखील येथील लेण्या पाहून कृत्यकृत्य वाटले. त्यांच्या सोबत असलेली जपानी भाषेतील लेण्यांची माहिती चाळीत ते सगळीकडे फिरत होते. चारवाजता तुळजा लेणी पाहून आमचा दौरा समाप्त झाला. तरी जुन्नरमधील या तिन्ही लेण्यांकडे ज्यांच्यामुळे सुलभ मार्गाने जाता आले त्या अमोल गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद.

– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *