बी.ए.पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले, मी इथेच राहावे व काही केल्या धाला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची ना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते. बडोद्याच्या नोकरीत मी करू नये यासाठी त्यांनी नाना तन्हांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा हट्ट सोडला नाही.
अखेर जे व्हायचे तेच झाले. मी बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला. ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली. त्याबरोबर मी बडोद्याहन मुंबईस पोहचण्यासाठी निघालो. वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्यासाठी सुरतेची बर्फी घ्यावी, म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना. पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली. म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते.
त्यामुळे मी दुस-या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहचलो. घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चरे झाले.
वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ माझ्या भेटीसाठीस त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही, याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला.
संदर्भ : माझी आत्मकथा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Very nice information
kupach chan post aahe tumchi aani tumchya post mudech aamhla khup kahi navin navin shikayla midto asech khup sare post lihit ja aani aamhala marg dakhbvat ja
Valuable info.