बातम्या

विद्यार्थ्यांनी आंबेडकर, पेरियार यांच्याविषयी वाचन केले पाहिजे – तामिळ सुपरस्टार विजय

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळख असलेला अभिनेता विजय जोसेफ हा राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी, १७ जून रोजी चेन्नई येथे त्याच्या चाहत्यांची संघटना ऑल इंडिया थलपथी विजय मक्कल इयक्कम आयोजित कार्यक्रमात बोलत विजय विद्यार्थांना उद्देशून बोलताना म्हणाला की, विद्यार्थ्यांनी आंबेडकर, पेरियार आणि कामराज यांच्याविषयी वाचन केले पाहिजे.

इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राजकारणात येणार किंवा नाही याविषयी त्याने काही बोलले नाही. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना आंबेडकर, पेरियार आणि कामराज सारख्या दिग्गजांना वाचण्याची आणि वाचण्याची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित केले. आज 22 जून रोजी अभिनेता विजय आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.