ब्लॉग

मध्यप्रदेशातील सांचीतील महाबोधी महोत्सव

मध्यप्रदेश राज्यात सांची येथील महाबोधी महोत्सवानिमित्त पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी तेथे धम्मयात्रा आयोजित केली होती. १९८७ साली प्रथम सांची पाहिल्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत एकदा सांचीला भेट देण्याचा योग वरील संस्थेतर्फे जुळून आला. तेथील महोत्सव पाहिल्यावर अशोक राजाच्या राणीची नगरी विदिशा गाव, सतधारा येथील स्तुप, सोनारी स्तुप आणि विहार तसेच उदयगिरी लेण्या येथे सुद्धा भेट देण्यात आली.

मध्य प्रदेशात पर्यटन करताना लक्षात आले की जसा महाराष्ट्र मध्ये बौद्ध समाज जागृत आहे, तसा इथला मागासवर्गीय समाज हा धम्माप्रती बिलकूल जागृत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तो जाणतो व त्यांना तो खूप मानतो सुद्धा. परंतु धम्माप्रती तो खूपच अज्ञानी आहे. सांची येथील महाबोधी महोत्सवामध्ये देखील त्यांचा सहभाग कमी आढळला. या महोत्सवासाठी लोक नटून-थटून बायका-पोराबाळांना घेऊन आले होते. परंतु तो एक मेळा-यात्रा समजून आलले दिसले. धम्माप्रती त्यांना काहीही देणेघेणे नव्हते व शिस्त ही नव्हती.

*मध्यप्रदेशातील सांचीतील महाबोधी महोत्सव* Sanchi Mahabodhi Celebration – Morning Dhamma Processionमध्यप्रदेश राज्यात सांची येथील महाबोधी महोत्सवानिमित्त पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी तेथे धम्मयात्रा आयोजित केली होती. १९८७ साली प्रथम सांची पाहिल्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत एकदा सांचीला भेट देण्याचा योग वरील संस्थेतर्फे जुळून आला. तेथील महोत्सव पाहिल्यावर अशोक राजाच्या राणीची नगरी विदिशा गाव, सतधारा येथील स्तुप, सोनारी स्तुप आणि विहार तसेच उदयगिरी लेण्या येथे सुद्धा भेट देण्यात आली. मध्य प्रदेशात पर्यटन करताना लक्षात आले की जसा महाराष्ट्र मध्ये बौद्ध समाज जागृत आहे, तसा इथला मागासवर्गीय समाज हा धम्माप्रती बिलकूल जागृत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तो जाणतो व त्यांना तो खूप मानतो सुद्धा. परंतु धम्माप्रती तो खूपच अज्ञानी आहे. सांची येथील महाबोधी महोत्सवामध्ये देखील त्यांचा सहभाग कमी आढळला. या महोत्सवासाठी लोक नटून-थटून बायका-पोराबाळांना घेऊन आले होते. परंतु तो एक मेळा-यात्रा समजून आलले दिसले. धम्माप्रती त्यांना काहीही देणेघेणे नव्हते व शिस्त ही नव्हती. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी आठ वाजता धम्म रॅली निघाली.पण त्या रॅलीत स्थानिकांचा सहभाग हा नगण्य दिसला हे पाहून वाईट वाटले. या रॅलीत महाराष्ट्रातील जास्त होते. यास्तव एक महाराष्ट्राचा शेजारी म्हणून मध्यप्रदेश राज्यात धम्मजागृती करणे हे काम महाराष्ट्रातील नव्या पिढीने स्वीकारले पाहिजे असे वाटते. मध्यप्रदेश राज्यात भारुत स्तूप, सतधारा येथील ३४ स्तुप आणि १४ विहार, सोनारी स्तूप, भोजपूर स्तुप, अंधेर स्तुप, विदिशा नगरी, सांची व उदयगिरी लेणी असा बौद्ध संस्कृतीचा भरघोस वारसा आहे. याबाबत अभिमान बाळगणे व धम्माप्रती तेथील सर्व समाजात जागृती करणे हे काम नवीन तरुण पिढीने सुरू केल्यास निश्चितच धम्माचे पाठबळ प्राप्त होईल. सोबत सकाळच्या धम्म रॅलीचे चित्रण सादर करीत आहे. — संजय सावंत ( नवी मुंबई )????????????

Posted by Sanjay Sawant on Friday, November 29, 2019

२४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी आठ वाजता धम्म रॅली निघाली.पण त्या रॅलीत स्थानिकांचा सहभाग हा नगण्य दिसला हे पाहून वाईट वाटले. या रॅलीत महाराष्ट्रातील जास्त होते. यास्तव एक महाराष्ट्राचा शेजारी म्हणून मध्यप्रदेश राज्यात धम्मजागृती करणे हे काम महाराष्ट्रातील नव्या पिढीने स्वीकारले पाहिजे असे वाटते. मध्यप्रदेश राज्यात भारुत स्तूप, सतधारा येथील ३४ स्तुप आणि १४ विहार, सोनारी स्तूप, भोजपूर स्तुप, अंधेर स्तुप, विदिशा नगरी, सांची व उदयगिरी लेणी असा बौद्ध संस्कृतीचा भरघोस वारसा आहे. याबाबत अभिमान बाळगणे व धम्माप्रती तेथील सर्व समाजात जागृती करणे हे काम नवीन तरुण पिढीने सुरू केल्यास निश्चितच धम्माचे पाठबळ प्राप्त होईल.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)